पुढची 100 वर्ष भारताच्या वाकड्यात जाणार नाही बाबा, पाकिस्तानची अक्कल ठिकाणावर

गेली कित्येक वर्ष पाकिस्तान काश्मीर, काश्मीर आमचा आहे असं जप करत होतं पण आता पाकिस्तान भिकेला लागलं आहे. त्यांचे स्वताचे खाण्याचे वांदे झाले आहेत.कर्जाच्या विळाख्यात आणि महागाईच्या तडाख्यात पाकिस्तानचे हाल झाले आहेत. पाकिस्तान आता पूर्णपणे कंगाल झाल्यानंतर पाकिस्तानने आता शेजारील देशाची जमवाजमवी करण्याचे ठरविले आहे.यासाठी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने परराष्ट्र नीती ठरविली आहे.

यामध्ये पाकिस्तान शेजारील देशांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणार आहे. 100 पानाच्या राष्ट्रीय सुधारणा नितीमध्ये सुरक्षा समितीने भारतासोबत संबंध सुधारत काश्मीर प्रश्नांवर तोडगा काढत भारताशी व्यापारी संबंध प्रस्थापित करण्याचे ठरविले आहे.

आम्ही पूढील 100 वर्ष तरी भारतासोबत दुश्मनी करणार नाही.आम्ही नवीन नीती आखली आहे, ज्या अंतर्गत आम्ही शेजारील देशांशी शांततापूर्ण संबंध निर्माण करणार आहोत.

जर काश्मीर मुद्द्यावर चर्चा झाली आणि त्यामध्ये प्रगती झाली तर भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध सुधारणार आहेत. पाकिस्तान आता भू रणनीती पेक्षा आर्थिक धोरणावर लक्ष केंद्रित करणार आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तान हे सांगणे सोप्पे आहे पण करणे अवघड आहे.