आमदारांच्या पोरांशी विमान तळ व्यवस्थापनाने घेतला पंगा, मग काय विमानतळाचं पाणीच तोडलं

राजकीय नेते आणि त्यांचे पुत्र आपल्या अधिकाऱ्याचा कधी कसा वापर करतील हे सांगता येत नाही. आज पर्यत अनेक आमदार पुत्रांनी त्यांच्या वडिलांच्या सत्तेचा दुरुपयोग केला आहे. चित्रपटांमध्ये देखील तसचं दाखवलं जातं. पण असाच एक भन्नाट प्रकार आंधप्रदेशातील एका विमानतळावर झाला. हे विमानतळ आहे जगप्रसिद्ध असे तिरूपती एयरपोर्ट. एका आमदार पुत्राचा विमान तळ अधिकाऱ्यांशी वाद झाला.

हा वाद इतक्या टोकाला गेला की या आमदार पुत्राने चक्क विमानतळ आणि विमानतळ कर्मचारी राहत असलेल्या वसाहती येथील पाणी थांबविले. हा आरोप ,मात्र आमदार पुत्राने फेटाळून लावला आहे. मात्र विरोधकांनी मात्र चांगलाच हा विषय लावून धरला आहे . हा सगळा प्रकार रेणुगुंठा विमानतळावर घडला. त्याचं झालं असं विमानतळाचे व्यवस्थापक सुनील आणि तिरूपतीचे उपमहापौर अभिनय रेड्डी यांच्यामध्ये मोठे वाद झाले. अभिनय यांनी रागाचा वचपा म्हणून विमान तळाचे पाणी थांबविले.

अभिनय हे आंध्रप्रदेशचे आमदार करुणाकर रेड्डी यांचे पुत्र आहेत. रेड्डी हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. अभिनय रेड्डी यांना काही दिवसांपूर्वी विमानतळावर प्रवेश नाकारला होता. अभिनय रेड्डी आणि विमानतळ व्यवस्थापक सुनील यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. हा वाद खूप विकोपाला गेला तरी देखील सुनील यांनी अभिनय रेड्डी यांना प्रवेश दिला नाही. चिडलेल्या अभिनय यांनी विमान तळाचे पाणी थांबविले या बरोबरच विमान स्टाफ जिथे राहतो तेथील पाणी देखील थांबविले.

हा वाद खूप विकोपाला गेला. विरोधकांनी देखील खूप टीका केली पण अभिनय यांनी सारे आरोप फेटाळून लावले.