भावाने उपचारसाठी 8 कोटी खर्च केले, 50 एकर जमीन विकली पण करोनाने त्यांचा घात केला

करोना आला आणि अनेकांचे घर कुटुंब जशाच्या तसे उद्ध्वस्त झाले. अनेकांच्या घरातील कर्ते सरते लोक देखील गेले. अनेकजन कर्ज बाजारी झाले. होत्याचं नव्हतं झालं. पाण्यासारखा पैसा खर्च करून देखील आपला माणूस जगवता आला नाही. पाणी देखील पाजता आलं नाही. असचं काही मध्य प्रदेशातील रिवा जिल्ह्यातील शेतकरी धर्मजय सिंह यांच्यासोबत झालं. धर्मजय हे एक प्रगतशील शेतकरी होते. त्यांना त्यांच्या यशस्वी शेतीसाठी अनेक पुरस्कार देखील मिळाले होते.

करोनाचा संसर्ग झाला त्यांतर धर्माजय यांना रिवा येथील संजय गांधी रुगालयात दाखल करण्यात आले. पण त्यांना फुफ्फुसाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला होता त्यामुळे त्यांची स्थिती आणखी ढासळत होती. त्यांना चेन्नई येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर तब्बल 8 महीने उपचार सुरू होते .त्यांच्यासाठी तब्बल 8 कोटी खर्च केले गेले पण ते वाचले नाहीत.

देशातील नामवंत डॉक्टर तसेच लंडन मधील डॉक्टर यांच्याद्वारे सिंह यांच्यावर उपचार सुरू होते.पण त्यांनी अखेरचा श्वास घेतला.धर्माजय यांची मौगंज भागातील राकरी येथे शेती होती. संपूर्ण राज्यात त्यांची स्वताची वेगळी ओळख होती. स्ट्रॉबेरी आणि गुलाबाची लागवड करून त्यांनी वेगळेच नाव कमावले होते.

त्यांना यासाठी अनेक पुरस्कार देखील मिळाले होते. जेव्हा त्यांना अपोलोमध्ये अॅडमिट केले तेव्हा ते चार दिवसांत करोनातून बरे झाले पण त्यांच्या फुफ्फुसाला मात्र 100 टक्के संसर्ग झाला होता.

त्यानं इक्मो मशीन वापरुन जीवनदान देण्याचा प्रयत्न केला गेला पण ते देखील शक्य झाले नाही. त्या नंतर त्यांचे ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना आयसीयूमध्ये हलविले.त्यांना अनेक आजार झाले त्यामुळे त्यांचा मृत्यु झाला. त्यानं दररोज चार लाख खर्च केले जायचे.

त्यांनी उपचारासाठी तब्बल 50 एकर जमीन देखील विकली.शेतकरी धर्माजय यांचे मोठे भाऊ प्रदीप सिंह हे वकील आहेत, म्हणतात वाचविण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले तब्बल 8 कोटी इतके बिल देखील आले पण भावाला वाचवता आले नाही. शासनाने केवळ 4 लाखांची मदत केली.