Sunil Shelke On Rohit Pawar: रोहित पवारांना अजितदादांची जागा घ्यायचीय, सुनील शेळकेंचा निशाणा

Sunil Shelke On Rohit Pawar: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार कर्तत जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि अजित पवारांचे कट्टर समर्थक सुनील शेळके (Sunil Shelake) यांच्यात तुफान जुंपल्याचं चित्र पहायला मिळालं आहे. रोहित पवार यांना अजित पवारांची जागा घ्यायची आहे. त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री बनायचं आहे, अशी टीका सुनील शेळके यांनी रोहित पवारांवर केली आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

“रोहित पवारांना स्वतःच कर्तृत्व सिद्ध करायचं आहे. पण, अजित पवारांनी महाराष्ट्रासाठी गेली २५ वर्ष झालं रक्ताचं पाणी केलं आहे. त्या अजित पवारांवर बोलून रोहित पवारांना मोठं व्हायचं आहे. मुळात अजित पवार यांनीच रोहित पवारांना राजकारणात आणलं आहे. कर्जत-जामखेडला उमेदवारी मिळवून त्यांना आमदार केलं. मतदारसंघाचा विकास केला. शेळके, लंके यांच्या पेक्षा अधिक प्रेम दिलं. पण, रोहित पवारांना अजित पवारांची जागा घ्यायची आहे. त्यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न पडत आहे. म्हणून अजित पवारांवर ते टीका करतात.”

“२०१९ ला ज्या घडामोडी घडल्या. त्या घडत असताना सर्व नेते एकत्र होते. कुठली भूमिका बदलायची?, कुणाला कुठली खाती द्यायची?, महायुतीत गेल्यास आपल्याला काय मिळेल?, या सर्व घडामोडी प्रत्येकाला माहीत आहेत. तरीही केवळ अजित पवारांना व्हिलन केलं जातं आहे. यावर अजित पवारांनी प्रत्यक्षात बोलावं. अजित पवारांना विरोधक व्हिलन, मलिदा गँग म्हणून बोलत आहेत. अजित पवारांनी सांगावं अशी वेळ आली आहे. त्यांनी त्यांची भूमिका मांडल्यास रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांना रस्त्यावर जनता फिरू देणार नाही”, असंही सुनील शेळके म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

NCP Maniesto |आरोग्य, शिक्षण,स्वच्छता, पर्यावरण आणि रोजगार या ग्रामविकासाच्या पंचसूत्रीवर राष्ट्रवादी काम करणार

एका रुग्णावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या, हा आरोप धादांत खोटा; राणा जगजितसिंहांचे ओमराजेंना प्रत्युत्तर

१० वर्षांपूर्वी मनपाने वाघोलीतील पाणी प्रश्नासाठी निधी दिला होता, ते काम अजूनही अपूर्ण, शिवाजीदादांची कोल्हेंवर टीका