रामदास आठवलेंच्या कवितांचे थेट राष्ट्रपतींनी केले कौतुक

नवि दिल्ली  –  राष्ट्रपती महामहिम दौपदी मुर्मु यांची आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी सदिच्छा भेट घेतली. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील चैत्यभूमी आणि नागपूर मधील दीक्षाभूमी  येथील स्मारकाला राष्ट्रपतींनी भेट द्यावी अशी सूचना यावेळी झालेल्या चर्चेत रामदास आठवले यांनी राष्ट्रपतींना केली. त्यावर महाराष्ट्र दौऱ्यावर असताना आपण जरूर चैत्यभूमी आणि दीक्षाभूमी येथे भेट देऊ असे आश्वासन महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी दिले.

जातीभेद निर्मूलनासाठी आंतरजातीय विवाह योजनेला प्रोत्साहन दिले पाहिजे.त्यासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालय मंत्रालयाकडून आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्याना अडीज लाख रुपये अनुदान दिले जाते याची माहिती ना.रामदास आठवले यांनी राष्ट्रपतींना दिली. देशभरात 20 कोटी एकर जमीन मोकळी उजाड माळरान असून ही जमीन भूमिहीनांना प्रत्येकी 5 एकर जमीन  कसण्यासाठी दिली जावी याबाबत रामदास आठवले यांनी राष्ट्रपतींशी चर्चा केली.

आठवलेंच्या कवितांचे राष्ट्रपतींनी केले कौतुक
यावेळी झालेल्या चर्चेत राष्ट्रपतींनी  रामदास आठवले यांच्या संसदेतील कवितांचे कौतुक केले.संसदेत त्यांच्या भाषणात शीघ्रकविता सदर करतात; भाषणात शीघ्रकविता  सादर करून वातावरण प्रफुल्लीत प्रसन्न करतात या  कविता आपल्याला आवडतात असे महामहिम राष्ट्रपतीद्रौपदी मुर्मु  यांनी रामदास आठवले यांचे कौतुक केले. राष्ट्रपती झाल्याबद्दल द्रौपदी मुर्मु  यांच्याबद्दल देशभरातील दलित आदिवासींना अभिमान असल्याचे रामदास आठवले यावेळी म्हणाले.

राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मु यांना रामदास आठवले यांच्या नेतृत्वात भेटलेल्या रिपाइंच्या शिष्टमंडळात रिपाइंचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष वेंकटस्वामी ; राष्ट्रीय संघटन सचिव भुपेश थुलकर;  उत्तर भारत अध्यक्षा मंजू छिबेरआणि ईशान्य भारत प्रभारी विनोद निकाळजे उपस्थित होते.