SA vs IND | टीम इंडियाला मोठा धक्का, कॅप्टनला मैदानातच झाल्या उलट्या

KL Rahul Vomiting: भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेला सुरुवात केली आहे. या मालिकेनंतर तीन एकदिवसीय सामने खेळवले जातील. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत बीसीसीआयने या मालिकेसाठी केएल राहुलकडे कर्णधारपद सोपवले आहे. राहुलने यासाठी तयारी सुरू केली आहे मात्र प्रशिक्षणाच्या पहिल्याच दिवशी राहुलची प्रकृती बिघडली आणि तो मैदानावर उलट्या करताना दिसला.

केएल राहुलला मैदानावर उलट्या झाल्या
केएल राहुलने मुंबईत प्रशिक्षण सत्र सुरू केले. या सत्राचा व्हिडिओ त्याने स्वतः शेअर केला आहे. राहुलने सांगितले की तो सत्रात धावणार आहे आणि फलंदाजी करणार आहे. राहुल धावू लागला पण काही वेळाने त्याला त्रास होऊ लागला. त्यामुळे राहूल मैदानाच्या बाजूला गेला आणि तिथे त्याला उलट्या होऊ लागल्या. तरीही त्याने आपले सत्र सुरूच ठेवले. फ्रेश होऊन तो पुन्हा धावू लागला.

जसप्रीत बुमराहने टोमणा मारला
राहुल बॅटिंगसाठी पॅड आणि हेल्मेट घेऊन येणार होता तोपर्यंत जसप्रीत बुमराहही तिथे पोहोचला होता. बुमराहकडे जाण्यापूर्वी राहुलने कॅमेरामध्ये सांगितले की, बुमराह तुम्हाला सांगेल की वेगवान गोलंदाजाचे काम किती कठीण असते. तसेच झाले. राहुल बॅटिंगसाठी तयार होत असताना बुमराह त्याला म्हणाला, ‘तुझे काम खूप सोपे आहे.’ हे ऐकून राहुल हसायला लागला. तो कॅमेरामनला म्हणाला, ‘बघा, हेच मी आधी बोललो होतो.’

महत्वाच्या बातम्या-

हे ट्रिपल इंजिन सरकार नसून ट्रबल इंजिन सरकार; जयंत पाटील विधानसभेत गरजले

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरा;अशोक चव्हाण यांची मागणी

धीरज साहू यांच्याकडे इतका अमाप काळा पैसा असेल तर दुकानाच्या मालकाकडे किती काळा पैसा असेल ?