वेदना होत असतानाही मॅक्सवेलने ‘सर्वश्रेष्ठ’ वनडे खेळी कशी खेळली? ऑस्ट्रेलियन कर्णधाराने केला खुलासा

Glenn Maxwell Double Century: ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने (Captain Pat Cummins) सांगितले की, अफगाणिस्तानविरुद्ध दुसऱ्या टोकावरुन ग्लेन मॅक्सवेलची चमत्कारी खेळी पाहणे नशीबवान होते. ग्लेन मॅक्सवेलने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील सर्वात मोठी खेळी खेळली.

ऑस्ट्रेलियन फलंदाजाने मंगळवारी विश्वचषक 2023 च्या 39 व्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध 128 चेंडूत 21 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीने नाबाद 201 धावा केल्या. मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाला 91/7 च्या स्थितीतून सोडवले आणि 292 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला.

नशिबाची साथ मिळाली
ग्लेन मॅक्सवेलला ही खेळी करण्यासाठी नशिबाची साथ लाभली. तो 27 धावांवर खेळत असताना एलबीडब्ल्यूचा निर्णय बदलण्यात आला. त्यानंतर अफगाणिस्तानच्या मुजीब उर रहमानने त्याचा झेल सोडला. त्यानंतर मॅक्सवेल 33 धावांवर खेळत होता. येथून मॅक्सवेल पूर्ण एकाग्रतेने खेळला आणि अफगाणिस्तानच्या गोलंदाजांवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले.

ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने ग्लेन मॅक्सवेलसह आठव्या विकेटसाठी 202 धावांची विक्रमी भागीदारी केली. कमिन्सने 68 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने नाबाद 12 धावा केल्या आणि दुसऱ्या टोकाकडून मॅक्सवेलच्या झंझावाती खेळीचा तो आनंद घेत राहिला.

मॅक्सवेल वेदनांशी झगडत होता
ग्लेन मॅक्सवेल मुंबईच्या उन्हामुळे हैराण दिसत होता. त्याचे स्नायू अखडले होते. त्यामुळे त्याला फलंदाजीदरम्यान त्रास होत होता. त्याला फिजिओची मदतही घ्यावी लागली. मात्र, वेदना सहन करूनही मॅक्सवेलने हार मानली नाही आणि एकदिवसीय क्रिकेटमधील एक संस्मरणीय खेळी खेळली. एवढ्या वेदना होत असतानाही ऑस्ट्रेलियाला विजयापर्यंत नेईपर्यंत मॅक्सवेल झुंजत राहिला.

पॅट कमिन्स काय म्हणाले?
मला वाटले की दुखापतीनंतर मॅक्सवेल मैदानाबाहेर जाईल. आमच्याकडे न्यू साउथ वेल्सचे दोन फलंदाज फलंदाजीसाठी बाकी होते. ते रांगेत होते. तेही त्यांच्या संधीची वाट पाहत होते. पण हो, मला वाटतं झम्पा तीन वेळा फलंदाजीसाठी तयार होऊनही परत आला. कारण मॅक्सवेलला आपला डाव पुढे चालू ठेवायचा होता.

मॅक्सवेलची खेळी त्याचे योगदान अमूल्य होते. ऑस्ट्रेलियन संघाने मिळवलेला विजय नेत्रदीपक होता. ही क्रिकेटसाठी मोठी गोष्ट होती. हा एक दिवस आहे जेव्हा लोक म्हणतील की हो आम्ही या सामन्यात स्टेडियममध्ये उपस्थित होतो, असे कमिन्स म्हणाला.

महत्वाच्या बातम्या-

दिवाळीत प्रदूषण करणारे फटाके टाळावेत; विद्याताई चव्हाण यांचे नागरिकांना आवाहन

बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मतदारांनी धडा शिकवला..

‘सरकारने मराठा आरक्षणावर एकमत केलं पाहिजे; मुख्यमंत्री एक बोलतात, उपमुख्यमंत्री दुसरं बोलतात’