आज रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला; कुठे, कधी आणि कसा पाहता येईल सामना? जाणून घ्या

भारत-पाकिस्तान क्रिकेट संघाचे चाहते दोन्ही देशांदरम्यान होणाऱ्या सामन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. यावेळी आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२३मध्ये (ICC Womens T20 World Cup 2023) हे संघ आमने सामने असणार आहेत. भारताचा महिला संघ रविवारी केपटाऊनमधील न्यूलँड्स क्रिकेट ग्राउंडवर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून टी२० विश्वचषक (India vs Pakistan T20 Match) मोहिमेचा शुभारंभ करेल. चला तर मग जाणून घेऊया हा सामना कधी, कुठे आणि कसा पाहता येईल?

जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप 👉🏻 https://chat.whatsapp.com/D3xA3iJHF0r1kodPsu0Q4H

भारत आणि पाकिस्तान संघात महिला टी२० विश्वचषक सामना कधी होणार?
रविवारी १२ फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात महिला टी२० विश्वचषक सामना खेळवला जाणार आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महिला टी२० विश्वचषक सामना कुठे खेळला जाईल?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महिला टी२० विश्वचषक सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना किती वाजता सुरू होईल?
भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६.३० वाजल्यापासून हा सामना उभय संघांमध्ये रंगणार आहे.

भारत-पाकिस्तान यांच्यात होणारा हा सामना चाहत्यांना कुठे पाहायला मिळणार?
भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाणारा हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर आणि डिस्ने + हॉटस्टारवर लाइव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.

टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया, ऋचा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवानी, पूजा वस्त्राकार, राजेश्वरी गायकवाड, राजेश्वरी गायकवाड.
राखीव खेळाडू: सबिनेनी मेघना, स्नेह राणा, मेघना सिंग.

टी२० विश्वचषकासाठी पाकिस्तान संघ
बिस्मा मारूफ (कर्णधार), आयमेन अन्वर, आलिया रियाझ, आयेशा नसीम, ​​सदफ शमास, फातिमा सना, जवेरिया खान, मुनीबा अली, नशरा संधू, निदा दार, ओमिमा सोहेल, सादिया इक्बाल, सिद्रा अमीन, सिद्रा नवाज, तुबा हसन.
राखीव खेळाडू: गुलाम फातिमा, कायनात इम्तियाज.