कॉंग्रेसची ताकत वाढणार; ‘हा’ अपक्ष आमदार लवकरच कॉंग्रेसमध्ये करणार प्रवेश

पणजी – पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून आता सर्वच पक्ष मोर्चेबांधणी सह निवडणूक कशी जिंकता येईल याकडे लक्ष देत आहेत. अनेकजण पक्ष बदल देखील करत असताना दिसून येत आहेत.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी, अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी रविवारी गोवा विधानसभेचा राजीनामा दिला . ते काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे. या आमदाराने गोवा विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केला .

दरम्यान, गोव्यात 14 फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुका होणार आहेत. सर्व राज्यातील मतमोजणी 10 मार्च रोजी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषदेत मतदानाच्या तारखा जाहीर केल्या. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.