Sharad Pawar | सध्याच्या नेतृत्वाकडे दूरदृष्टीचा अभाव, शरद पवार यांची मोदींवर टीका

Sharad Pawar | देशाची सत्ता तुमच्या हातात आहे. त्या सत्तेचा वापर कसा केला, आणि देशाचं चित्र बदलण्यासाठी तुम्ही काय केलं हे सांगण्याऐवजी अन्य लोकांवर टीका केली पाहिजे, याचा अर्थ आजच्या नेतृत्वाकडे दूरदृष्टीचा अभाव आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.

महाविकास आघाडीचे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार बळवंतराव वानखेडे यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेतून शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

शरद पवार म्हणाले की, देशाची सत्ता मोदींच्या हाती आहे. गेली दहा वर्ष आपण पाहत आहोत. अनेक ठिकाणची त्यांची भाषण ऐकत आहोत. मी विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभेत गेल्या ५६ वर्षपासुन आहे. संसदेत अशी एकही व्यक्ती नाही की एकाही दिवसाचा गॅप न घेता सतत निवडून येतो. या ५६ वर्षात अनेकांना मी जवळून पाहिलं. लांबून पाहिलं. इंदिरा गांधींना पाहिलं. राजीव गांधींचं कामकाज पाहिलं. नरसिंह राव, मनमोहन सिंग यांच्यासोबत काम केलं. जे जे पंतप्रधान झाले, नेहरू नंतरचे त्या सर्वांच्या कामाची पद्धत पाहिली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात जायचं भाषणं करायचं आणि नवा भारत कसा उभा राहील लोकांचा आत्मविश्वास कसा वाढेल याचं काम ते करायचे. आजचे पंतप्रधान कुठेही गेल्यानंतर पहिल्यांदा नेहरूंवर टीका करतात असे शरद पवार म्हणाले.

पुढे शरद पवार म्हणाले की, ज्या नेहरुंनी स्वातंत्र्याच्या पूर्व काळात आयुष्याची उमेदीचा काळ इंग्रजांच्या तुरुंगात घालवली. स्वातंत्र्यानंतर देश संसदीय पद्दतीने चालला पाहिजे. त्यासाठी रचना उभी केली. त्या नेहरूंचं योगदान देशाच्या इतिहासातून पुसून काढू शकत नाही. पण आजचे पंतप्रधान हे नेहरूंवर टीका करतात. त्यांच्या चुका शोधतात. पण दहा वर्षात मी काय केलं हे सांगत नाही. तुमच्या हातात सत्ता आहे. त्या सत्तेचा वापर कसा केला, आणि देशाचं चित्र बदलण्यासाठी तुम्ही काय केलं हे सांगण्याऐवजी अन्य लोकांवर टीका केली पाहिजे, याचा अर्थ आजच्या नेतृत्वाकडे दूरदृष्टीचा अभाव आहे. त्यामुळे त्यांच्या हातून सत्ता काढून घेतली पाहिजे असेही शरद पवार म्हणाले.

यावर सविस्तर बोलताना शरद पवार म्हणाले की, राज्यसभा आणि लोकसभेचे सदस्य त्या ठिकाणी येतात. सर्व पक्षाचे सदस्य येतात. गप्पा मारतात. तिथे पक्षीय अंतर कोणी आणत नाही. पण आम्ही पाहतो मोदी तिथून जात असल्यावर सत्ताधारी खासदार मान खाली घालतात. मोदींना दिसू नये म्हणून. इतकी दहशत आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा सत्ता द्यायची का? असे शरद पवार म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Chandrashekhar Bawankule | महाराष्ट्राचा महानालायक कोण? या स्पर्धेत उद्धव ठाकरे पहिले येतील, फडणवीसांवरील टीकेला बावनकुळेंचं प्रत्युत्तर

Sunil Tatkare | संविधान बचाव नावाने विरोधकांनी प्रचाराची वैचारिक पातळी खाली आणलीय

Narendra Modi | जनतेवर विश्वास नसलेल्या काँग्रेस आघाडीवर विश्वास ठेवू नका! पंतप्रधान मोदी यांचे आवाहन