दोन मुले आणि नवऱ्याला टाकून प्रियकरासाठी पाकिस्तानात गेली अंजू, आता ‘तो’ व्हिडिओ आला समोर

Anju Case: भारत सोडून प्रियकरासाठी पाकिस्तानात गेलेल्या अंजूचे संपूर्ण सत्य समोर आले आहे. अंजूने पाकिस्तानात आपला धर्म बदलला आहे. अंजूपासून ती फातिमा झाली आहे. तिने तिचा कथित मित्र नसरुल्लाहशी लग्नही केले आहे. नसरुल्लाहसोबत कोर्टात जातानाचा तिचा व्हिडीओ आणि तिचा निकाहनामा पाकिस्तानी चॅनेलवर समोर आला आहे. मात्र दोघेही लग्नाची चर्चा नाकारत आहेत.

अंजू आणि तिचा कथित मित्र नसरुल्ला यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. अंजूने हा व्हिडिओ शेअर केला आहे. दोघेही एका जोडप्याप्रमाणे पाकिस्तानच्या डोंगर आणि मैदानात एकमेकांचा हात धरताना दिसत आहेत. अंजूने खैबर पख्तूनख्वामध्ये व्हिडिओ शूट केल्याचे सांगितले जात आहे. दोघे एका बागेत एकत्र बसलेले दिसतात.

अंजूचा जन्म उत्तर प्रदेशातील कैलोर गावात झाला आणि ती लग्नानंतर राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात राहात होती. अंजूच्या पतीचे नाव अरविंद आहे. त्यांना 15 वर्षांची मुलगी आणि सहा वर्षांचा मुलगा आहे. 20 जुलै रोजी ती जयपूरला जाण्याच्या बहाण्याने घरून निघाली आणि वाघा-अटारी सीमेवरून पाकिस्तानात पोहोचली. तिने 2020 मध्ये व्हिसा बनवला होता. तिचा व्हिसा पाकिस्तानमध्ये 20 ऑगस्टपर्यंत वैध आहे. 2019 मध्ये अंजू आणि पाकिस्तानी नसरुल्ला यांच्यात फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाली होती. ती नियमानुसार पाकिस्तानात गेली असून ती नियमानुसार भारतात परतणार आहे. अंजू धर्मांतर करण्यापूर्वी ख्रिश्चन होती.