इंदोरीकर महाराजांचे ३० मेपर्यंत सर्व कार्यक्रम रद्द, माफी मागत काढलं पत्रक

नगर – समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यांची प्रकृती खालावल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना सक्तीचा विश्राम करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे त्यांचे २३ मे ते ३० मेपर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे.

ह.भ.प निवृती महाराज देशमुख यांचे अनेक ठिकाणी किर्तनाचे कार्यक्रम होते. पण सर्व कार्यक्रम रद्द झाल्यामुळे आयोजकांची गैरसोय झाली आहे. यासंबंधी इंदोरीकर महाराजांची दिलगीरी व्यक्त केली असून पत्रक जारी केले आहे. तर वैद्यकीय उपचारानंतर पुन्हा सेवेत रूजू होणार असल्याचंही त्यांनी पत्रामध्ये लिहलं आहे. महाराष्ट्र टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.