Supriya Sule: भावनिक राजकारण करणे सुप्रिया सुळे यांची अपरिहार्यता?

Loksabha Election :- अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक (Baramati Loksabha 2024 Election) ही लक्ष्यवेधी ठरणार हे निश्चित आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर इंडिया आघाडीकडून खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) मैदानात आहेत. विकासकामांच्या मुद्द्यावरवर हि निवडणूक लढवली जाईल अशी शक्यता होती मात्र गेल्या काही दिवसांपासून सुप्रिया सुळे या भावनिक राजकारण करून सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.

शरद पवार यांना राजकीय दृष्ट्या संपवण्याचे षडयंत्र भाजप करत असल्याचा आरोप त्या सातत्याने करत आहेत. बारामती लोकसभा जिंकण्यासाठी भाजपचे नेते एकवटले आहेत. आम्ही मात्र सत्याच्या मार्गाने बारामती लोकसभा जिंकू असं सांगत सुप्रिया सुळे यांच्याकडून भावनिक आवाहन केले जात आहे.

वास्तविकता पाहिली तर सुप्रिया सुळे यांनी विकासकामांच्या मुद्द्यावर मते मागायला हवीत मात्र तसे न करता इमोशनल कार्ड खेळून मते मिळवण्याचा सध्या तरी सुळे यांचा प्रयत्न दिसत आहे. सुळे या असे इमोशनल कार्ड का खेळत आहेत याचा विचार केला तर यंदा त्यांच्यापुढील आव्हान खूपच तगडे असल्याने त्या असे करीत असाव्यात असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

या मतदारसंघातील राजकीय समीकरणे सुद्धा सुप्रिया सुळे यांना अनुकूल नसल्याचे चित्र आहे. माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या बंडाचा तसेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांच्या नाराजीचा काही प्रमाणात त्यांना फायदा होईल अशी शक्यता निर्माण झाली होती मात्र ती शक्यता देखील मावळली आहे. याशिवाय सर्वात महत्वाचे म्हणजे घरातूनच आव्हान निर्माण झाल्याने सुप्रिया सुळे या चिंतेत आहेत. युगेन्द्र पवार, श्रीनिवास पवार यांना आपल्या बाजूला वळवण्यात शरद पवार यशस्वी ठरले असले तरीही त्याचा फार मोठा प्रभाव दिसून येत नसल्याचे चित्र आहे.

दुसऱ्या बाजूला कोणताही बडेजाव न करता, वादग्रस्त वक्तव्य न करता तसेच थेट लोकांशी संपर्क साधण्यावर सुनेत्रा पवारांनी भर दिला आहे. त्यांनी विविध समाज घटकांच्या भेटी घेण्याचा धडाका लावला असून त्यांच्या या साधेपणाचे लोकांमध्ये कौतुक होताना पाहायला मिळत आहे. मित्र पक्ष असणाऱ्या भाजप, शिवसेना आणि महायुतीमधील घटक पक्षांनी देखील सुनेत्रा पवारांच्या पाठीमागे ताकत लावली असून सध्या त्यांचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, सुनेत्रा पवार यांची बाजू वरचढ ठरत असली तरीही मतदारांच्या पर्यंत पोहचण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. मित्र पक्षांना नाराज न करता पुढील वाटचाल करावी लागणार आहे. शेवटी मतदार राजाच्या हातात या दोन्ही महिला नेत्यांचे भवितव्य असून कुणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार हे निकालाच्या नंतरच स्पष्ट होईल.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या-

Sanjay Kokate | शिंदे गटाचे नेते संजय कोकाटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्ष प्रवेश

पोकळ घोषणा देणाऱ्या काँग्रेस आघाडीला पराभूत करा;आठवलेंचे पुदुचेरीत आवाहन

Mangaldas Bandal | मंगलदास बांदल यांची शिरुरची उमेदवारी रद्द, वंचित दुसरा उमेदवार देणार ?