Mangaldas Bandal | मंगलदास बांदल यांची शिरुरची उमेदवारी रद्द, वंचित दुसरा उमेदवार देणार ? 

Mangaldas Bandal | शिरूर लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने उमेदवारीबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वी जाहीर केलेल्या त्यांच्या उमेदवाराचे तिकीट रद्द करण्यात आले आहे. शिरूरमधून मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) यांना वंचित बहुजन आघाडीने संधी दिली होती. पण त्यांनी पक्षाच्या निर्णयाला विरोध केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. याबद्दलची माहिती वंचितच्या सोशल मीडिया हॅन्डलवरून दिली.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. तसेच, वंचित बहुजन आघाडीने बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा देत तेथे उमेदवार न देण्याचे धोरण ठरवले होते. मात्र बांदल यांनी वेगळी भूमिका घेतल्याने त्यांच्यावर हि कारवाई करण्यात आली आहे.

बारामतीबाबत जो निर्णय वंचितने घेतला, त्या विरोधात मंगलदास बांदल गेल्याने वंचित बहुजन आघाडीने मंगलदास बांदल यांची शिरुर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखा  ठाकूर यांच्या सूचनेनुसार रद्द करण्यात आली आहे.

मंगलदास बांदल यांच्या तिकीटानंतर शिरूरच्या निवडणुकीला चांगला रंग आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आढळराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अमोल कोल्हे तर वंचितकडून बांदल उभे होते. या निवडणुकीत बांदल हे निर्णायक मते घेतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पण पक्षविरोधी कृती केल्याने त्यांच्यावर ही कारवाई केली आहे. आता ही निवडणूक आढळराव पाटील विरुद्ध कोल्हे होणार की वंचित दुसरा उमेदवार देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | आम्हाला पडणारं मतदान निश्चित आहे; मोहोळांबाबत धीरज घाटेंनी व्यक्त केला विश्वास

Shirur LokSabha 2024 | शिरूर लोकसभा मतदारसंघात कुणाचे पारडे जड? राजकीय गणितं काय ?

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचे ‘बूथ विजय अभियान’, प्रत्येक बुथवर ३७० मते वाढविण्याचा निर्धार