IPL 2023: गुजरात टायटन्सला मोठा धक्का, ‘हा’ स्टार खेळाडू संपूर्ण हंगामातून बाहेर

IPL 2023: IPL 16 च्या पहिल्या सामन्यात, चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध शानदार विजयाने सुरुवात करणाऱ्या गुजरात टायटन्ससाठी रविवारी एक दुःखद बातमी समोर आली आहे. हार्दिक पांड्याच्या संघाने पहिला सामना नक्कीच जिंकला पण संघाला अशी वेदना झाली जी संपूर्ण हंगामात सतावत राहू शकते. संघाचा स्टार खेळाडू केन विल्यमसन आता संपूर्ण हंगामासाठी बाहेर असणार आहे. गतविजेत्या गुजरातसाठी हा मोठा धक्का ठरू शकतो. फ्रँचायझीने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे.

विल्यमसनला दुखापत कशी झाली?
जेव्हा CSK गुजरातचा सामना सुरु होता त्यावेई चेन्नईच्या डावातील 13वे षटक जोशुआ लिटल टाकत होता. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सीएसकेचा फलंदाज रुतुराज गायकवाडने एक लांबलचक फटका मारला. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात असताना सीमारेषेजवळ उभ्या असलेल्या केन विल्यमसनने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करत चेंडू पकडण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण याच वेळी त्याला जबरदस्त दुखापत झाली. त्याच्या हाताला तसेच पायाला दणका बसला. केनने शानदार क्षेत्ररक्षण करत संघाच्या 2 धावा वाचवल्या पण तो उठून स्वतःच्या पायावर उभा राहू शकला नाही आणि स्वतः चालताही आले नाही.