रामनवमीच्या दिवशी झालेल्या दगडफेकीबाबत बागेश्वर बाबांचे वक्तव्य, हिंदूंना केले ‘हे’ आवाहन

देशाच्या विविध भागात रामनवमीच्या (Ramnavami) दिवशी झालेल्या दगडफेकीवरून बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) यांचे विधान समोर आले आहे. ते म्हणाले, रामनवमीला पुन्हा दगडफेक झाली. महाराष्ट्रात, गुजरातमध्ये, हावडा येथे दगडफेक झाली. आम्ही फक्त प्रार्थना करा की हिंदूंना आता जागे व्हावे लागेल, रामाच्या यात्रेवर कोणी दगड फेकू नये म्हणून एकजूट झाली पाहिजे.

मध्य प्रदेशातील दमोहला लागून असलेल्या साबर जबलपूर हायवे बायपासवर 12.5 एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या एका बसस्थानकाच्या भूमिपूजनाच्या वेळी बाबा बागेश्वर जनतेला संबोधित करत होते. बाबा पुढे म्हणाले, सर्व हिंदूंनी एक व्हा, रामाच्या यात्रेवर दगडफेक करणाऱ्यांच्या तोंडाला कुलूप लावा, जोपर्यंत हिंदू एक होत नाहीत, तोपर्यंत ही दगडफेक थांबणार नाही, बाकी हनुमानजींची इच्छा आहे.

दरम्यान, जबलपूरमधील एका कार्यक्रमातही धीरेंद्र शास्त्री म्हणाले होते की, देश तेव्हाच हिंदू राष्ट्र होईल जेव्हा लोक हातात माला आणि भाला दोन्ही ठेवतील. त्याशिवाय भारत हिंदू राष्ट्र होणार नाही. त्यामुळे लोकांनी प्रत्येक परिस्थितीसाठी तयार राहावे, असे बागेश्वर सरकारने सांगितले.