Israel : पॅलेस्टीनच्या विरोधात इस्रायलने केली युद्धाची घोषणा; स्वोर्ड्स ऑफ आयर्न मोहिमेद्वारे शत्रूला घडवणार अद्दल

Israel – पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासनं (Palestinian terrorist organization Hamas) केलेल्या हल्ल्यांमध्ये तीनशेहून अधिक लोक ठार आणि दीड हजारहून अधिक लोक जखमी झाल्यानंतर इस्रायली संरक्षण दलांनी स्वोर्ड्स ऑफ आयर्न (Swords of Iron) मोहीम सुरु केली आहे. गाझा पट्टीतील हमासच्या ताब्यातील १७ लष्करी कुंपण आणि चार केंद्रांवर इस्रायलनं हल्ला करुन २३० हून अधिक लोकांना ठार केलं. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Israeli Prime Minister Benjamin Netanyahu) यानी हमासविरुद्ध युद्धाची घोषणा केली आहे.

हमासनं गाझामध्ये अनेक इस्रायली लोकांना पकडून ओलिस ठेवलं आहे. हमासनं केलेल्या अग्नीबाणांच्या हल्ल्यांमध्ये तेल अविव, रेहोवोत, गेदेरा आणि अशकेलोन (Tel Aviv, Rehovot, Gedera and Ashkelon) यासह अनेक शहरांना लक्ष्य बनवलं. यानंतर अनेक हमास दहशतवाद्यांनी गाझा पट्टीतून इस्रायलमध्ये प्रवेश केला आणि शहरं ताब्यात घेतली. हमासचा लष्करी कमांडर मुहम्मद अल-दैफ (Hamas military commander Muhammad al-Daif) यानं या मोहिमेला अल-अक्सा स्टॉर्म असं नाव दिलं असून इस्रायलनं महिलावरील हल्ले तसंच काही धार्मिक स्थळांना कथितपणे भ्रष्ट करणं तसंच गाझाला टाकलेला वेढा यांच्या विरोधात हे हल्ले असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हमास दहशतवाद्यांद्वारे इस्रायलवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे आणि इस्रायलला पाठिंबा व्यक्त केला आहे. (Prime Minister Narendra Modi has expressed his support for Israel)या हल्ल्यानंतर पॅलेस्टीनमधील भारतीय प्रतिनिधी कार्यालयानं रामल्ला इथल्या भारतियांना आपत्कालीन स्थितीत थेट संपर्क करण्याचं आवाहन केलं आहे.

https://www.youtube.com/watch?v=fTZWF6rmkXs

महत्वाच्या बातम्या-

राहुलजींच्या केसाला धक्का लावला तर ‘सळो की पळो करुन सोडू’ – Nana Patole

खलिस्तानचा आणि चीनचा बागुलबुवा येत्या निवडणुकीत दाखवला जाणार आहे : P. Sainath

मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी अखेर घेतला राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा