जसप्रीत बुमराह परतला; बीसीसीआयने त्याच्या घातक गोलंदाजीचा व्हिडिओ शेअर केला

Jasprit Bumrah : भारत आणि आयर्लंड (INDvsIRE) यांच्यात 18 ऑगस्टपासून T20 मालिका खेळवली जाणार आहे. जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा कर्णधार असेल. बऱ्याच दिवसांनी तो परतला आहे. बुमराह दुखापतीमुळे बाहेर होता. पण आता फिट. बुमराह नुकताच नेटमध्ये गोलंदाजी करताना दिसला. त्याच्या गोलंदाजीमुळे फलंदाज त्रस्त दिसत होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बुमराहच्या गोलंदाजीचा व्हिडिओ ट्विट केला आहे. यावर चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत.

टीम इंडियाने खेळाडूंच्या सरावाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये बुमराह नेटमध्ये गोलंदाजी करताना दिसत आहे.मराहचे चाहते त्याच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. टीम इंडिया आशिया कपसाठी बुमराहलाही संघात स्थान देऊ शकते. यासोबतच व्यवस्थापन विश्वचषकाबाबतही विचार करू शकते.

 

विशेष म्हणजे 18 ऑगस्ट रोजी भारत आणि आयर्लंड यांच्यात टी-20 मालिकेतील पहिला सामना खेळवला जाणार आहे. यानंतर दुसरा सामना 20 ऑगस्टला आणि तिसरा सामना 23 ऑगस्टला होणार आहे. हे सर्व सामने डब्लिन येथे होणार आहेत. बुमराहच्या नेतृत्वाखालील संघात भारताने बहुतांश युवा खेळाडूंचा समावेश केला आहे. भारताने ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा आणि रिंकू सिंग यांना संघात स्थान दिले आहे. त्यांच्यासोबत वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, शाहबाज अहमद, मुकेश कुमार आणि आवेश खान यांचाही संघात समावेश आहे.