Vishal Agarwal | ड्रायव्हरला खोटा जबाब द्यायला भाग पाडल्याने विशाल अग्रवाल अडचणीत, आणखी दोन गुन्हे दाखल होणार

Vishal Agarwal | कल्याणी नगर अपघात प्रकरण दिवसेंदिवस हे प्रकरण जास्तच चिघळत चालले आहे. पोर्श कारने दोन दुचाकीस्वारांना चिरडणाऱ्या अल्पवयीन आरोपीला बाल सुधार गृहात पाठवण्यात आला असून त्याच्या पित्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी आता नवीन माहिती समोर आली आहे. अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल (Vishal Agarwal) यांच्यावर आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात येऊ शकतात.

आपल्या अल्पवयीन मुलाकडून अपघात झाल्याची माहिती मिळताच विशाल अग्रवाल यांनी ड्रायव्हरला फोन केला होता. तू गाडी चालवत होतास असं पोलिसांना सांग. त्याबद्दल तुला बक्षीस देऊ, असं विशाल अग्रवाल यांनी ड्रायव्हरला सांगितल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. ड्रायव्हरला खोटा जबाब देण्यास विशाल अग्रवाल यांनीच भाग पाडल्याने कलम २०१ अंतर्गत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा विशाल अग्रवाल यांच्यावर दाखल करण्यात येणार आहे. अल्पवयीन मुलासोत कारमध्ये असलेल्या ड्रायव्हरला तु कार चालवत होता असं पोलिसांना खोटं सांग असं विशाल अग्रवालने ड्रायव्हरला सांगितल्याच पोलिस तपासात निष्पन्न झालंय. त्यामुळे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येणार. तर विशाल अगरवालवर आरटीओच्या तक्रारीनंतर कलम ४२० च्या अंतर्गत दुसरा गुन्हा दाखल करण्यात येणार. पोर्शे कारची नोंदणी झालेली नसतांना नोंद झाल्याची खोटी माहिती दिल्याबद्द्ल गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप