90-92 टक्के ठिकाणी सकाळची अजान झाली नाही, मौलवींचे आभार – राज ठाकरे 

मुंबई – आज मुंबईत जवळपास नव्वद ते ९२ टक्के मशिदींवर अजान झाली नाही. मुंबईत ११४० मशिदींवर अजान झाली नाही. तर १३५ मशिदींवर पहाटे ५ च्या आत अजान झाली. हे यापुढे कायमस्वरुपी सुरु राहिलं पाहिजे, पण जोपर्यंत हे लाऊडस्पीकर खाली उतरत नाहीत तो पर्यंत आमचं आंदोलन सुरुच राहिल, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे(MNS president Raj Thackeray)यांनी दिला आहे. याचवेळी त्यांनी ज्या मशिदींवर भोंगे लागले नाहीत, त्या मशिदींमधील मौलवींचे त्यांनी आभारही मानले आहेत.

पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली आहे. अनेक ठिकाणी माझ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले जात आहेत. पण जे कायद्याचं पालन करत आहेत त्यांना तुम्ही सजा देणार आणि जे पालन करत नाहीत त्यांना मोकळीक देणार, असं कसं चालेल. असा थेट सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

जवळपास 90-92 टक्के ठिकाणी महाराष्ट्रात सकाळची अजान झाली नाही, सर्व ठिकाणी आमची माणसं तयार होती. त्या मशिदीमधील मौलवींचे मी आभार मानेन. आमचा विषय आहे तो विषय त्यांना समजला. मुंबईचा जो रिपोर्ट आला, त्याप्रमाणे मुंबईत 1 हजार 140 मशिदी आहेत. त्यापैकी 135 मशिदींमध्ये सकाळची अजान 5 च्या आत वाजवली गेली. काल मला विश्वास नांगरे पाटलांचा(Vishwas Nagre Patil)फोन आला, आम्ही सर्व मौलनींशी बोललो, सकाळची अजान लावणार नाही असं त्यांनी सांगितलंं. आता ज्या 135 मशिदींनी अजान लावली त्यांच्यावर कारवाई होणार का? की आमच्याच पोरांना उचलणार? असा सवाल यावेळी राज ठाकरेंनी केला.