काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांचा भाजपामध्ये प्रवेश

धुळे जिल्ह्यातील बाळासाहेब भदाणे यांच्यासह अनेक कार्यकर्तेही भाजपामध्ये

Ulhas Patil: जळगावचे माजी खासदार आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ.केतकी पाटील, धुळे जिल्ह्यातील बाळासाहेब भदाणे यांच्यासह काँग्रेस, उबाठा गटातील अनेक सरपंच, कार्यकर्त्यांनी बुधवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन, खा. डॉ. सुभाष भामरे, आ. जयकुमार रावल, आ. मंगेश चव्हाण, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, विक्रांत पाटील, जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, रावेर ग्रामीण अध्यक्ष अमोल जावळे आदी यावेळी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या विकास कामांचे प्रस्ताव तातडीने मार्गी लावले जातील, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (CHandrashekhar Bawankule) यांनी यावेळी जाहीर केले.

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी यावेळी सांगितले की, मोदी सरकारने भारताचे नाव जगात उंचावले आहे. भारताला क्रमांक एकचा देश बनविण्याचा संकल्प केला आहे. अशा नेत्यांच्या हाताखाली काम करायला मिळणे हे सर्व कार्यकर्त्यांचे भाग्य आहे. राज्यातील महायुतीचे सरकारही राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या कणखर नेतृत्वामुळेच डॉ. उल्हास पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ, जाणत्या काँग्रेस नेत्याने भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या सर्व नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा पक्षात यथोचित सन्मान केला जाईल असेही बावनकुळे यांनी सांगितले. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी डॉ. उल्हास पाटील यांच्या शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. डॉ.पाटील यांच्या प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टी आणखी बळकट होईल आणि उत्तर महाराष्ट्रात यापुढील काळात आणखी पक्ष प्रवेश होतील, असेही श्री. महाजन यांनी नमूद केले. डॉ. केतकी पाटील यांची भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केल्याचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी जाहीर केले. जळगाव मधील डॉ. वर्षा पाटील, देवेंद्रभैय्या मराठे, संदेश पाटील, पुंजाजी पाटील, सुरेंद्र कोल्हे, राजू राणे आदींसह काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला. धुळे जिल्ह्यातील 67 सरपंचांनी बाळासाहेब भदाणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये प्रवेश केला. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रभाकर भदाणे, बापजी आदिवासी संघटनेचे अध्यक्ष भरत जाधव, धुळे तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष अशोक सुडके, अनिल कचवे आदींचा त्यात समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

मनोज जरांगे पाटील मनुवादी, मनुवादी लोकांना आरक्षण देऊ नये; लक्ष्मण माने यांचे वक्तव्य

राज्यातील विमानतळांचा कालबद्धरित्या विकास करावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘काहीही झालं तरी झुकणार नाही’, ईडीकडून ११ तास चौकशीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया