Udayanraje Bhosale | मी संन्यास घेतलेला नाही, प्रत्येकाला तिकीट हवंय! उदयनराजें भोसलेंच्या मनात आहे तरी काय?

Udayanraje Bhosale | भाजपाने जाहीर केलेल्या राज्यातील पहिल्या लोकसभा उमेदवार यादीत साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांच्या नावाचा समावेश नाही. लोकसभेसाठी भाजपाने उदयनराजेंचे तिकीट कापल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. अगदी उदयनराजेंनीही एबीपी माझाशी बोलताना अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली आहे.

माझ्याकडे तिकीट आहे, प्लेनचं तिकीट आहे, ट्रेनचं तिकीट आहे, पिक्चरचं तिकीट आहे, बसचं तिकीट आहे, मात्र इतर तिकिटाचं मला काही माहीत नाही असं सुचक विधान केलं. त्यामुळे उदयनराजे हे पहिल्या यादीमध्ये नाव न आल्याने नाराज आहेत का? अशी चर्चा रंगली आहे.

दरम्यान पुढील निर्णयावर आत्ताच बोलणे उचित नसल्याचेही उदयनराजे (Udayanraje Bhosale ) यावेळी म्हणाले. त्यांनी महायुतीतील जागावाटपावर भाष्य केले. ते म्हणाले की, महायुतीमध्ये तीन पक्ष एकत्र आले आहेत. प्रत्येकाला वाटते की मला तिकीट मिळाले पाहिजे. आणि ते रास्त असून त्यामध्ये चुकीचं काही नसल्याचे सांगितले. त्याचबरोबर मी काही संन्यास घेणार नसल्याचे त्यांनी एक सूचक वक्तव्य यावेळी केले. त्यामुळे सातारा लोकसभेला उदयनराजे वेगळी भूमिका घेणार का? अशी चर्चा रंगली आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | निलेशला मीच पक्षात आणलं, त्याला प्रचंड निधीही दिला, पण…. अजित पवारांनी मनातली खदखद बोलून दाखवली

Ajit Pawar | पक्षातून वेगळे झालात, मग शरद पवारांचे फोटो कशाला वापरता? सुप्रीम कोर्टाने अजित पवारांना फटकारले

Nitin Gadkari | नागपूर शहरात २४ तास पाणी पुरवठ्याचे स्वप्न पूर्णत्वाकडे