विराटप्रमाणेच आता अनुष्का देखील क्रिकेटच्या मैदानात ! तयारी पाहून थक्क व्हाल…

दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा तिचा आगामी चित्रपट ‘चकदा एक्सप्रेस’साठी चांगलीच मेहनत घेताना दिसत आहे. अनुष्का शर्माचा पती विराट कोहली प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू आहे. त्यामुळे आता अनुष्का देखील चाहत्यांना क्रिकेट खेळताना दिसणार आहे. ‘चकदा एक्स्प्रेस’ या चित्रपटात ती भारताची प्रमुख महिला गोलंदाज झुलन गोस्वामीची भूमिका साकारताना दिसणार आहे.

अनुष्का शर्मा आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर नेहमी वर्कआउटशी संबंधित पोस्ट शेअर करीत असते. तिने पडद्यावर झुलनची भूमिका साकारण्यासाठी तयारी सुरू केली आहे. अनुष्का शर्मा ही भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक राहिली आहे. तिने चित्रपटात अनेक फिटनेस संबंधित भूमिका साकारल्या आहेत. झूलनची भूमिका प्रभावीपणे करण्यासाठी आवश्यक असलेली शरीरयष्टी आणि फिटनेसची पातळी गाठण्यासाठी तीने बऱ्याच दिवसांनी वर्कआउट सुरू केले आहे.

अनुष्का शर्मा ने भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक सस्मंरणीय स्त्री पात्रे दिली आहेत. सुलतान, NH10, बँड बाजा बारात, परी, फिल्लौरी, पीके यासारख्या चित्रपटातून तिने प्रेक्षकांनावर छाप सोडली आहे. ती चित्रपटातील पात्रांनुसार स्वतः मध्ये बदल करण्यास देखील ओळखली जाते. झुलन हा असाच एक चित्रपट आहे, ज्यामुळे आपल्याला अनुष्काचा विंटेज परफॉर्मन्स पाहण्याची संधी मिळेल.

 

चकदा एक्स्प्रेस हा चित्रपट भारतीय महिला वेगवान गोलंदाज झुलनच्या जीवनाविषयी आहे. ती जगातील सर्वात वेगवान महिला गोलंदाजांपैकी एक आहे. चुकीच्या राजकारणामुळे निर्माण झालेल्या असंख्य अडथळ्यांना पार करत तीने क्रिकेटमध्ये नवी ओळख तयार केली आहे. तिचा हा संघर्ष आता प्रेक्षकांना चित्रपटात बघायला मिळणार आहे.