कंगना रणौतनं नुपूर शर्मा यांना दिला जाहीर पाठींबा; म्हणाली, हिंदू देवतांना अपमानित केलं जातं तेव्हा…

नवी दिल्ली – भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांचे प्राथमिक सदस्यत्व निलंबित करण्यात आले आहे. प्रेषित मोहम्मद (Prophet Muhammad) यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पक्षाने कारवाई केली आहे. नवीन कुमार जिंदाल (Navin Kumar Jindal) यांनाही पक्षाच्या सदस्यत्वावरून निलंबित करण्यात आले आहे.नवीन कुमार जिंदाल हे दिल्ली भाजपचे मीडिया प्रमुख आहेत. नुपूर शर्मा यांचे प्राथमिक सदस्यत्व सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. या सर्व घडामोडी घडल्यानंतर शर्मा यांनी आपल्या वक्तव्यावरून माफीही मागितली होती. रागाच्या भरात ते वक्तव्य केल्याचा खुलासा त्यांनी केला होता.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनं आता देशात सर्वाधित चर्चेत असलेल्या नुपूर शर्मा प्रकरणावर भाष्य केलं आहे. राष्ट्रीय प्रवक्त्या नूपुर शर्मा यांना प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपने निलंबित केलं होतं. या प्रकरणावर बोलताना कंगनानं नूपुर यांना पाठिंबा दिला आहे.

कंगनानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात भारतीय लोकशाहीबद्दल बोलत कंगनानं नूपुर शर्मा यांना पाठिंबा दिला आहे. कंगनानं लिहिलं, “नूपुरला तिचं म्हणणं मांडण्याचं स्वतंत्र्य आहे. तिला ज्या प्रकरे धमक्या दिल्या जात आहे ते मी पाहिलं आहे. जेव्हा प्रत्येक दिवशी हिंदू देवतांना अपमानित केलं जातं तेव्हा आपण न्यायालयात न्याय मागतो. किमान आता तरी असं करू नका. हे काही अफगाणिस्तान (Afghanistan) नाही. आपला देश एक संपूर्ण व्यवस्था असलेलं सरकारकडून चालवला जातो. जे सरकार लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि त्याला लोकशाही म्हणतात. हे फक्त त्या लोकांना आठवण करून देण्यासाठी आहे जे नेहमीच विसरतात.”