भारतावर अशीही वेळ कधी येईल असे वाटले नव्हते; नुपूर शर्मा प्रकरणावरून शिवसेनेची भाजपवर टीका 

नवी दिल्ली – भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांचे प्राथमिक सदस्यत्व निलंबित करण्यात आले आहे. प्रेषित मोहम्मद (Prophet Muhammad) यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पक्षाने कारवाई केली आहे. नवीन कुमार जिंदाल (Navin Kumar Jindal) यांनाही पक्षाच्या सदस्यत्वावरून निलंबित करण्यात आले आहे.

नवीन कुमार जिंदाल हे दिल्ली भाजपचे मीडिया प्रमुख आहेत. नुपूर शर्मा यांचे प्राथमिक सदस्यत्व सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. इराण, कतार आणि कुवेत या तीन प्रमुख आखाती देशांनी भारतीय राजदूतांना बोलावून विरोध केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या सर्व घडामोडी घडल्यानंतर शर्मा यांनी आपल्या वक्तव्यावरून माफीही मागितली होती. रागाच्या भरात ते वक्तव्य केल्याचा खुलासा त्यांनी केला होता.

याप्रकरणी शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून भाजपावर जोरदार टीका करण्यात आली आहे. गेल्या सात-आठ वर्षांत नेपाळ, भूतानसारख्या राष्ट्रांनीही भारताला शहाणपण शिकविण्याचा प्रयत्न केला आहे अशीही टीका शिवसेनेने केली आहे. गेल्या सात-आठ वर्षांत नेपाळ, भूतानसारख्या राष्ट्रांनीही भारताला शहाणपण शिकविण्याचा प्रयत्न केला. आता कतारबरोबर मालदिवही भारताच्या माफीची मागणी करीत आहे. या देशांचे आकारमान जागतिक नकाशावर एखाद्या टिंबाएवढेही नाही. त्यांच्याकडे ना सैन्यबळ ना अणुशक्ती! तरीही भारतासारख्या अण्वस्त्र्सज्ज देशाकडे पाहून हे देश गुरगुरत आहेत. भारतावर अशीही वेळ कधी येईल असे वाटले नव्हते, असे शिवसेनेने म्हटले आहे.