पैगंबरांबाबतच्या वक्तव्यानंतर अलकायदाची मुंबईसह या महत्त्वाच्या शहरांत आत्मघाती हल्ल्यांची धमकी

नवी दिल्ली – भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांचे प्राथमिक सदस्यत्व निलंबित करण्यात आले आहे. प्रेषित मोहम्मद (Prophet Muhammad) यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पक्षाने कारवाई केली आहे. नवीन कुमार जिंदाल (Navin Kumar Jindal) यांनाही पक्षाच्या सदस्यत्वावरून निलंबित करण्यात आले आहे.

नवीन कुमार जिंदाल हे दिल्ली भाजपचे मीडिया प्रमुख आहेत. नुपूर शर्मा यांचे प्राथमिक सदस्यत्व सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. या सर्व घडामोडी घडल्यानंतर शर्मा यांनी आपल्या वक्तव्यावरून माफीही मागितली होती. रागाच्या भरात ते वक्तव्य केल्याचा खुलासा त्यांनी केला होता.

या पार्श्वभूमीवर आता अलकायदा (Al Qaeda) या दहशतवादी संघटनेनं भारतात आत्मघाती हल्ले करण्याची धमकी दिली आहे. गुजरात, उत्तर प्रदेश, मुंबई आणि दिल्लीत आत्मघाती हल्ले करण्यासाठी तयार असल्याची अधिकृत धमकी दिली गेली आहे (al-qaeda Threatens Suicide Attacks). त्याचबरोबर भाजप लवकरच संपुष्टात येईल, असंही यात म्हटलं आहे.
अलकायदाने म्हटलं की, काही दिवसांपूर्वी एका हिंदुत्व प्रचारकाने टीबीच्या चर्चेदरम्यान इस्लाम आणि प्रेषित मोहम्मद यांचा अपमान केला होता. त्यांच्या वक्तव्यामुळे जगभरातील मुस्लिमांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. अलकायदाने पुढे म्हटलं, ‘आम्ही पैगंबरांच्या अपमानाचा बदला घेऊ. आम्ही इतरांना या लढ्यात सहभागी होण्यास सांगू. पैगंबर मोहम्मद यांचा अपमान करणाऱ्यांना आम्ही मारून टाकू. आम्ही आमच्या शरीराला आणि आमच्या मुलांच्या शरीराला स्फोटके जोडू, जेणेकरून अशा लोकांना उडवता येईल..

पैगंबर मुहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना आम्ही माफ करणार नाही. दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील भगव्या कार्यकर्त्यांना संपवणार. ते आपल्या घरात लपू शकणार नाहीत किंवा सुरक्षा दलही त्यांना वाचवू शकणार नाहीत. न्यूज 18 लीक्मात्ने याबाबत वृत्त दिले आहे.