Rana JagjitSingh Patil | विजयानंतर शिवसेनेच्या अस्मितेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, राणा जगजीतसिंगांचा शब्द

Rana JagjitSingh Patil | धाराशिव हा शिवसेनेचा पारंपारीक मतदारसंघ मात्र, या लोकसभा निवडणुकीत हा मतदारसंघ महायुतीतील राष्ट्रवादीच्या वाट्याला आला. यापार्श्वभूमीवर माहायुतीचे नेते राणा जगजीतसिंग पाटील (Rana JagjitSingh Patil) म्हणाले, धाराशिव मधून महायुतीचा उमेदवार निवडून आल्यानंतर सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन कामं केली जातील. तसेच शिवसेना, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत, त्यांच्या अस्मितेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा शब्द देखील राणा जगजीतसिंग पाटील यांनी यावेळी शिवसैनिकांना दिला.

आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर धाराशिव येथे शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी महायुतीतील भाजप नेते राणा जगजीतसिंग पाटील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.

राणा जगजीतसिंग पाटील म्हणाले, ही निवडणूक देश पातळीवरची आहे आणि यातील विषय देखील देश स्तरावरचे आहेत. अस्मिता जी आहे ती राजकीय अस्मिता आहे आणि आता तुम्ही – आम्ही याच राजकीय अस्मितेनुसार काम केलं पाहिजे. अर्चना पाटील या जरी राष्ट्रवादीच्या उमेदवार असल्या , त्याचं चिन्ह घड्याळ असलं तरी त्या महायुतीच्या उमेदवार आहेत हे आपण लक्षात ठेवला पाहिजे, असे ते म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | जेवढी मतदानाची टक्केवारी वाढेल, तेवढ्या महायुतीच्या जागा जास्त निवडून येतील – चंद्रकांत पाटील

Shirur LokSabha | “मी डमी नाही तर डॅडी उमेदवार आहे”, आढळराव पाटलांचे अमोल कोल्हेंचे प्रत्युत्तर

Sunetra Pawar | केंद्र व राज्य सरकारचा दुवा बनून समस्यांचं निराकरण करणार; सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन