INDvsPAK: ‘तो निर्णय घेत पाकिस्तानने भारताला आयती संधी दिली’, सामना संपण्यापूर्वीच घाबरले पाकडे!!

Shoaib Akhtar: भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघात कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर आशिया चषकातील सुपर फोर सामना सुरू आहे. हा सामना जिंकत दोन्ही संघांकडे उपांत्य सामन्याचे तिकीट पक्के करण्याची सुवर्णसंधी आहे. या सामन्यात २४ षटकांचा खेळ झाल्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने खेळ काही वेळ थांबवावा लागला. दरम्यान पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने या सामन्यावर लक्षवेधी प्रतिक्रिया दिली आहे.

त्याचे झाले असे की, नाणेफेकीचा कौल पाकिस्तानच्या पारड्यात पडला. यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याने नाणेफेक जिंकत प्रथम गलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र अख्तरला आझमचा हा निर्णय आवडलेला नाही.

शोएब म्हणाला की, पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय का घेतला मला माहित नाही. मात्र हा निर्णय ऐकताच मी थक्क झालो. दोन दिवस इथे पाऊसही नाही. त्यामुळे पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करायला हवी होती, कारण मागच्या सामन्यात भारताविरूद्ध बाबरच्या संघाला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. पाकिस्तान अजूनही फेव्हरेट आहे पण त्यांनी भारताला आयती संधी दिली आहे, असे म्हणत शोएबने एकप्रकारे सामना जिंकण्यापूर्वीच हार मानली असल्याचे दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘आनंदाचा शिधा’ वाटपात लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी – छगन भुजबळ

तुम्ही PIN शिवाय 500 रुपये पाठवू शकता, Paytm वर UPI Lite सक्रिय करण्याची प्रक्रिया जाणून घ्या

पाकिस्तान जिंकेल वनडे विश्वचषक, शोएब अख्तरने व्यक्त केला विश्वास; म्हणाला, भारत…

रामोशी, बेरड समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबद्ध – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस