अवसरवादी ताई, सरडाही इतके रंग बदलत नाही, जितकी तुम्ही नावं बदलता; मनसेचे थेट खटक्यावर बोट

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या (Shiv Sena) नेत्या दिपाली सय्यद (Dipali Sayyad) या मनसेला (MNS) लक्ष्य करताना दिसून येत आहेत. मात्र आता मनसेकडून सय्यद यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. मनसे नेते अखिल चित्रे (Akhil Chitre) यांनी दीपाली सय्यद यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांनी बदललेल्या नावांवरून निशाणा साधला आहे.

ते म्हणाले, अवसरवादी ताई, तुम्हाला धड तुमचं नाव माहिती नाही. प्रत्येक वेळी राजकारणासाठी नाव बदलणाऱ्या तुम्ही. २०१४ साली अहमदनगरमधून निवडणूक लढवली, तर नाव दिपाली सय्यद. २०१९ला शिवसेनेकडून मुंब्रा-कळव्यातून निवडणूक लढवली, तर नाव सोफिया जहांगीर सय्यद. शिवसेनेत आणि शिवसंग्राममध्ये असताना प्रचारासाठी नाव दिपाली भोसले सय्यद. वारंवार राजकारणासाठी स्वत:चं नाव बदलणाऱ्या तुम्ही. तुम्हाला अवसरवादी नेत्या म्हणावं लागेल. तुम्ही इतरांना नावं ठेवता?”, असं अखिल चित्रे यांनी म्हटलं आहे.

तुम्हाला काय उत्तर द्यायचं? म्हणून आम्ही तुम्हाला इतके दिवस वाईड बॉल म्हणून उत्तर देत नव्हतो. इतके तर सरडाही रंग बदलत नाही, जितकी तुम्ही नावं बदलता. आप ते शिवसंग्राम ते शिवसेना हा तुमचा विचार बदलत आणि नाव बदलत झालेला प्रवास आहे. तुमच्यात हिंमत असेल, तर आधी नाव बदलण्यामागचं रहस्य जनतेला आधी सांगा. नंतर हिंदुत्वाच्या, शिवसेनेच्या, बाळासाहेबांच्या विचारांच्या गप्पा मारा. आम्ही अपेक्षा करतो की तुम्ही उत्तर द्याल, अशा शब्दांत अखिल चित्रेंनी दिपाली सय्यद यांना आव्हान दिलं आहे.