ज्यांचा भारतात जन्म झाला, ते हिंदूच; मलाही हिंदू म्हणा – आरिफ मोहम्मद खान 

तिरुअनंतपुरम –  ज्यांचा भारतात जन्म झाला आहे, ज्यांनी भारतातील अन्न खाल्लं आहे. त्या सर्वांना हिंदू (Hindu) म्हणण्याचा हक्क आहे, असं केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान (Arif Mohammad Khan) यांनी वक्तव्य केले आहे.  अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे (एएमयू) संस्थापक सर सय्यद अहमद खान यांनी एका हिंदू परिषदेदरम्यान सांगितलेल्या शब्दांची आठवण करून देताना खान यांनी हे विधान केले. केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान शनिवारी तिरुअनंतपुरममध्ये हिंदू कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी झाले होते. यावेळी ते म्हणाले की, आर्य समाजाच्या लोकांनी केलेल्या स्वागतावेळी ते म्हणाले की, मी त्यांच्या योगदानाचा आदर करत आहोत याबद्दल मी कृतज्ञ आहे, पण माझी तक्रार आहे की तुम्ही मला हिंदू का म्हणत नाही?

आरिफ मोहम्मद म्हणाले की हिंदू ही धार्मिक संज्ञा आहे असे मला वाटत नाही, तर ती भौगोलिक संज्ञा आहे. ते म्हणाले की जो कोणी भारतात जन्माला आला आहे, जो कोणी भारतात उत्पादित अन्न खातो, जो कोणी भारतातील नद्यांचे पाणी पितो, त्याला स्वतःला हिंदू म्हणवण्याचा अधिकार आहे. ते म्हणाले की तुम्ही मला हिंदू म्हणा.