‘आयपीएल’चा किंग कोण…? फक्त चेन्नई सुपर किंग्स !

शारजाह : फाफ डु प्लेसिसचे दमदार अर्धशतक, शार्दुल ठाकूरचा भेदक मारा आणि रवींद्र जडेजाची क्षेत्ररक्षणासोबत उपयुक्त गोलंदाजी यामुळे चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाइट रायडर्सला २७ धावांनी धूळ चारत आयपीएलचे चौथे विजेतेपद नावावर केले आहे.

दुबईच्या मैदानावर रंगलेल्या महामुकाबल्यात चेन्नईचा कप्तान महेंद्रसिंह धोनीने अनुभवाचा पुरेपूर वापर करत महत्त्वाच्या क्षणी सामन्याला कलाटणी दिली. नाणेफेक गमावलेल्या चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना कोलकातासमोर २० षटकात ३ बाद १९२ धावा केल्या. सलामीवीर फाफ डु प्लेसिसने तडाखेबंद ८६ धावांची खेळी केली.

त्याला ऋतुराज, उथप्पा आणि मोईन अलीची योग्य साथ मिळाली. प्रत्युत्तरात कोलकाताचे सलामीवीर व्यंकटेश अय्यर आणि शुबमन गिल यांनी ९१ धावांची दमदार सलामी दिली. पण मधल्या फळीत फलंदाजांनी घेतलेल्या दबावामुळे कोलकाता आपल्या तिसऱ्या जेतेपदापासून लांब राहिली. त्यांना २० षटकात ९ बाद १६५ धावांपर्यंतच पोहोचला आले.

हे देखील पहा