अमित शहांच्या पुणे दौऱ्याची विरोधकांना धास्ती, भाजप कार्यकर्त्यांमध्ये संचारला उत्साह 

पुणे : केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shah) काल दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर (Amit Shah Pune Tour) आले आहेत. सीमा सुरक्षा दलाच्या विशेष विमानाने सिंहगड काॅलेज येथे आगमन झालं. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केले. त्यानंतर त्यांनी काल पुण्यातील विविध कायक्रमाला उपस्थिती लावली. यातच त्यांनी पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचीही भेट घेतली. सध्या पुण्यात कसबा पेठ आणि चिंचवडची पोटनिवडणुक लागली आहे. त्यामुळे अमित शहांच्या या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. सुरूवातीला टिळकांच्या घरात उमेदवारी न दिल्याने ब्राम्हण समाज नाराज असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. परंतु राज्यातील प्रमुख नेत्यांनी शैलेश टिळक आणि कुणाल टिळकांची भेट घेऊन नाराजी दुर केली. यातच ब्राम्हण समाजाचा मेळावा देखील पार पडला. याचबरोबर काल अमित शहांनी देखील शैलेश टिळक आणि कुणाल टिळकांची भेट घेतली.

याआधी अमित शहा यांनी गिरीश बापट यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपुस केली. गिरीश बापट गेल्या काही दिवसापांसून आजारी आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. यातच ओंकारेश्वर मंदिरातून दर्शन घेतल्यानंतर अमित शहा यांनी बापटांची भेट घेतली. त्यानंतर अमित शहा यांनी कसब्यातील पोटनिवडणुकीसंदर्भातही कार्यकर्त्यांशी संवाद साधल्याचं बोलण्यात येत आहे. त्यामुळे अमित शहा पुण्यात आले, ना सभा, ना रॅली तरी पोटनिवडणुकीतीबाबत  विरोधकांंना धास्ती भरली आहे. अशी चर्चा सध्या पुण्यात चर्चीली जात आहे.

दरम्यान, आज पुण्यातील आंबेगाव याठिकाणी शिवसृष्टी लोकार्पण सोहळा अमित शहा यांच्या उपस्थिती होत आहे. त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्री व इतर राज्यातील मंत्री देखील उपस्थितीत आहेत. सध्या पुण्यात पोटनिवडणुकांसाठी प्रचार प्रसार सुरू आहे.  यातच अमित शहा यांचा पुणे अत्यंत महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.