अनेकदा अनेकजण घोषणा करून नारळ फोडतात पण यातून फक्त नारळ विक्री वाढते – मुख्यमंत्री

मुंबई : आपल्यातील रुसवा फुगवा, कटुता निर्माण व्हावी अशा काही लोक मनातल्या मनात गुढ्या उभारत आहेत. कारण त्यांना दुसरा उद्योग नाही. कामाच्या गुढ्या उभारत शकत नाहीत. मग सरकार पाडण्याच्या गुढ्या मनातल्या मनात उभारत असतात. त्याला आपण हे दिलेलं आपल्या कृतीतील चोख उत्तर आहे, असा टोमणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विरोधकांना मारला.

हे काम सर्वांचं आहे. आमच्या मनात कुणाच्याही बाबत भेदभाव नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. तसेच सरकारमध्ये कोणतेही रुसवे फुगवे नाहीत. सरकारचे नाव महाविकास आघाडी (maha vikas aghadi) आहे. ही आघाडी जमिनीवर राहून राज्य विकासाचे नियोजनबद्ध काम करत आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.आपण काम करत होतो आणि आहोत पण आता घेत असलेले कष्ट मोठ्याने सांगण्याची वेळ आली आहे महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांना छेद देऊन विकास कामे लोकापर्यंत पोहोचवण्याची वेळ आलीय अशी ते म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्या हस्ते डाळा येथील वस्तू आणि सेवा कर भवनाच्या (gst bhavan) इमारतीचे ऑनलाईन भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.ते म्हणाले, सध्या जे वातावरण निर्माण केले जात आहे, महाराष्ट्राची बदनामी करण्याचे कारस्थान सुरु आहे, त्या महाराष्ट्राचा द्वेष करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो, महाराष्ट्र देशाच्या अर्थव्यवस्थेत सर्वाधिक योगदान देणारे राज्य नसते तर देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का लागला असता. त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी करू नका.असं देखील ते म्हणाले.

अनेकदा अनेकजण घोषणा करून नारळ फोडतात पण यातून फक्त नारळ विक्री वाढते. आपलं तसं नाही आज आपण प्रत्यक्ष काम सुरु करत आहोत, हा महत्वाचा फरक आहे. हे काम बघितल्यावर आपल्यात कटुता निर्माण करणाऱ्यांना नक्की उत्तर मिळेल. सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना आपल्या कृतीतून आपण आज चोख उत्तर दिले आहे. आमच्यात कुठलेही भेदभाव नाहीत हे दाखवून दिले आहे.