Ketaki Chitle : हिंदुत्ववादी केतकी चितळेने राज्य सरकारला झाप झाप झापले; वाचा नेमकं घडलंय काय

Ketaki Chitle : अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitle) आणि वाद हे समीकरण जणू ठरलेलेच आहे. केतकी नेहमी तिच्या वादग्रस्त पोस्टमुळे चर्चेत असते. ती सातत्याने राजकीय विषयांवर निर्भीडपणे आपले मत मांडत असते. अशातच आता राज्य सरकारच्या ‘वक्फ बोर्डा’ला जाहीर केलेल्या १० कोटींच्या निधीवरून केतकीने टीका केली आहे. वक्फ बोर्डाला १० कोटींचा निधी जाहीर करण्याच्या निर्णयावरून केतकीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या प्रमुख नेत्यांना लक्ष्य केले आहे.

इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत केतकीने म्हटले, ‘नमस्कार, धक्कादायक बातमी वाचून उठली. त्यामुळे काय बोलू कळत नाहीये. ज्या लोकांनी तुम्हाला मते दिलं नाही. त्यांच्या बळकटीकरणासाठी १० कोटी देत आहात. तुम्ही बधीर आहात की, तुम्ही आम्हाला बधीर करुन सोडणार आहात’.

‘लोकसभेत कोणाला मत द्यायचं, हे ठरलं होतं. त्यावेळी माझा पंतप्रधान ठरला होता. पण विधानसभेला कोणता झेंडा घेऊ हाती? आता माझं ठाम मत झालं आहे की, तुम्ही वक्फ बोर्डाला १० कोटी मंजूर करताय. तुमचं तिघांचं सरकार आहे. तुम्ही विधानसभेत मत किती संख्येने कमी करणार, हे तुमचं ध्येय आहे का? असा सवाल केतकीने केला.

वक्फ बोर्डाच्या बळकटीकरणासाठी पैसा देत आहेत का? वक्फ बोर्डामधील माणसे तुमच्याजवळ जमिनी मागण्यासाठी आलं तर काय कराल. यामुळे हिंदूच्या अनेक जागा हडपल्या आहेत. सरकारनंतर वक्फ बोर्डाकडे सर्वाधिक जागा आहेत. संघानंतर सनातनी लोकांना तोडत आहात. तुमच्यामुळे मतदान करताना नोटाचं बटन दाबेल, असा इशारा केतकीने दिला.

‘मानखुर्द बांगलादेशींनी भरलेलं आहे. तुम्हाला छत्रपती संभाजीनगर नको, तुम्हाला औरंगाबाद हवंय. महाराष्ट्राचं नाव बदलून टाका. फुले,शाहू, आंबेडकरांचं नाव सरकारने घेऊ नये. त्यांनी हे काम कधीही केलं नाही. त्यांचं नाव तोंडातूनही काढू नका,अशीही चितळे म्हणाले.