अहमदनगर पेरियार पँथर्स संघाची विजयी हट्रिक

के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज- अहमदनगर पेरियार पँथर्सने आपल्या तिसऱ्या सामन्यांत लातूर विजयनगारा विर्सचा अक्षरशः धुव्वा उडवला. पहिल्या काही मिनिटामध्ये लातूर संघावर लोन टाकत अहमदनगर संघाने 15 -3 अशी आघाडी मिळवली. शिवम पटारे व प्रफुल झावरे यांच्या आक्रमक खेळाच्या जोरावर मध्यंतराला अहमदनगर संघाकडे 38-5 अशी भक्कम आघाडी मिळवली.

अहमदनगर संघाकडून आज प्रफुल झावरे आक्रमक खेळ करताना दिसला. पहिलाच हाफ मध्ये सुपर टेन पूर्ण केला. शिवम पटारे ने मध्यंतरानंतर सुपर टेन पूर्ण करत स्पर्धेतील सलग तिसरा सुपर टेन पूर्ण केला. अहमदनगर संघाच्या बचावफळी मध्ये अजित पवारने 7 पकडी करत हाय पूर्ण केला.

अहमदनगर संघाने 68-24 असा मोठा विजय मिळवत गुणतालिकेत पहिला स्थान कायम केलं. प्रफुल झावरे ने सर्वाधिक 20 गुणांची कमाई करत अहमदनगर संघाच्या तिसरा विजयात मोलाची भूमिका बजावली. शिवम पटारे ने चढाईत 14 गुण मिळवले. लातूर संघाकडून प्रदीप अकांगिरे 7 गुण मिळवले.

बेस्ट रेडर- प्रफुल झावरे, अहमदनगर पेरियार पँथर्स
बेस्ट डिफेंडर- अजित पवार, अहमदनगर पेरियार पँथर्स
कबड्डी का कमाल- शिवम पटारे, अहमदनगर पेरियार पँथर्स