गौतमी पाटीलशी पंगा, मग बघा तिचा इंगा! छेड काढणाऱ्या तरुणाला थेट गर्दीत घुसून तुडवलं

सांगली- लावणी डान्सर गौतमी पाटील (Gautami Patil) ही सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आहे. लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करणाऱ्या गौतमीवर आतापर्यंत अनेक स्थरातून टिका झाली आहे. मात्र लावणीची आवड असणाऱ्या लोकांमध्ये गौतमी पाटील म्हणजे लोकप्रिय चेहरा आहे. नाक मुरडतच का होईना लोक गौतमी पाटीलची ओळख सांगताना दिसतात. नेहमीच कोणत्या-ना-कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणाऱ्या गौतमी पाटील हिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडिओत (Gautami Patil Viral Video) गौतमीचे रौद्र रूप पाहायला मिळाले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेली डान्सर (Gautami Patil Lavni) गौतमी हिने राज्यभरातील तरुणांना भुरळ पाडली आहे. गौतमीच्या अदा पाहण्यासाठी कार्यक्रमांना मोठी गर्दी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. लोकं जागा नसली तर अगदी झाडावर चढून तिचा डान्स पाहताना दिसतात. मात्र एका कार्यक्रमात हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणावर संतापून गौतमीने त्याला इंगा दाखवल्याचा व्हिडिओ सध्या चर्चेत आलाय.

सांगली जिल्ह्यातील बेडग गावामध्ये झालेल्या तिच्या लावणीच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची गर्दी लोटली होती. अलीकडे व्हायरल या व्हिडीओमध्ये गौतमी पाटील छेड काढणाऱ्या तरुणाला मारहाण करताना दिसत आहे. हा व्हिडीओ तीन महिने जुना असल्याचं सांगण्यात येत आहे. हुल्लडबाज तरुणाच्या चुकीच्या कृतीने संतप्त झालेल्या गौतमीने तरुणाला मारहाण केल्याचा दावा कऱण्यात येत आहे. गौतमीच्या या राऊडी स्टाईल धुलाई करतानाच्या व्हिडिओ वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.