खेलो इंडीया राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा 2022 : गंगाखेडच्या आनंदवन शाळेच्या निकीता लंगोटे कडे महाराष्ट्राची धुरा…

गंगाखेड/विनायक आंधळे : उद्यापासून होत असलेल्या खेलो इंडीया राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा 2022 (Khelo India Youth Games 2022) मध्यप्रदेश मध्ये होत आहेत. त्यात महाराष्ट्राचा मुले – मुलीचा संघ सहभागी होतोय. महाराष्ट्राच्या (Maharashtra) मुलींच्या संघाच्या कर्णधारपदी आनंदवन क्रीडा मंडळ गंगाखेड (Gangakhed) ची राष्ट्रीय कबड्डी खेळाडु निकीता लंगोटे (Nikita Langote) हीची निवड करण्यात आली आहे.

निकीता ची कामगीरी…

सन 2017 – शालेय नॅशनल (छत्तिसगढ)

सन 2019 – किशोरी गट राज्यस्तरीय स्पर्धेत दुसरा क्रमांक

सन 2022 – 68वी सिनियर महिला नॅशनल (हरियाना)

सन 2022 – चौथी खेलो इंडीया हरियाना सिल्व्हर मेडल.

सन 2022 – 36वी नॅशनल गेम्स गुजरात ब्रान्झ पदक.

सन 2022 – 49वी कुमारी गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत ब्रान्झ पदक.

वरील सर्व उत्तुकृष्ठ कबड्डीतील कामगीरी पाहुन मध्यप्रदेश (Madhya Pradesh) मध्ये होत असलेल्या खेलो इंडीया राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत निकीताची कर्णधार म्हणून निवड केली गेली. परभणी (Parbhani) जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर (MLA Suresh Varpudkar), गंगाखेड विधानसभेचे आमदार डाॅ. रत्नाकर गुट्टे (MLA Dr. Ratnakar Gutte), महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कोषाध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त मंगल पांडे, आनंदवन क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेश राठोड, मुख्याध्यापक विलास राठोड यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या निवडीसाठी जिल्ह्यातील कबड्डी क्रीडा मंडळे, कबड्डी प्रेमीच्या वतीने निकितावर कौतुकाचा वर्षाव होत आह्रे.