Pune News | ‘बर्थ ऑफ मदर री बर्थ ऑफ वुमन’ या आगामी पुस्तकातून उलगडणार मातृत्वाचा प्रवास

Pune News : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शलाका मनीष तांबे लिखित बर्थ ऑफ मदर री बर्थ ऑफ वुमन या या पुस्तकाचे प्रकाशन ८ मार्च 2024 रोजी दुपारी ४.०० वाजता ऑर्किड हॉटेल बाणेर (Pune News) या ठिकाणी संपन्न होणार आहे.

या संदर्भात माहिती देताना या पुस्तकाच्या लेखिका शलाका तांबे यांनी त्यांना आलेल्या स्वानुभवामधून लिहिले असल्याचे सांगितले . या पुस्तकाचे प्रकाशन सकाळ माध्यम समूहाच्या कार्यकारी संपादक सौ शीतल पवार यांच्या हस्ते होणार आहे या पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर परिसावंदाचे आयोजन करण्यात आले आहे या परिसंवादामध्ये मध्ये डॉ .सुनीता ललवाणी (प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ ),डॉ पारस दैठणकर (मानसोपचार तज्ज्ञ) हे भाग घेणार आहेत.

ह्या पुस्तकाची ही प्रथम आवृत्ती इंग्रजी भाषेमध्ये असणार आहे लवकरच ह्या पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रकाशित करण्याचा आमचा मानस असल्याचे सौ तांबे यांनी सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

Amit Shah | उद्धव ठाकरेंना आदित्य आणि शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचंय, अमित शाहांचा हल्लाबोल

Amit Shah | महाराष्ट्र 50 वर्षांपासून तुमचा भार सोसतोय! अमित शाह शरद पवारांवर बरसले

राम आमचा शत्रू आहे, रामायणावर आमचा विश्वास नाही… तमिळनाडूच्या नेत्याचे वादग्रस्त विधान