‘प्रोटीन पावडरी घेऊन, इंजेक्शनं टोचून…’, पुण्यात तरुणीचा जीव वाचवणाऱ्या लेशपालचं मराठी अभिनेत्याने केलं कौतुक

पुण्यात काल दर्शना पवार हत्या प्रकरणाची (Darshana Pawar Murder Case) पुनरावृत्ती होता होता राहिली. कॉेलज तरुणीवर एमपीएससी करणाऱ्या तिच्या मित्राने सदाशिव पेठेत कोयत्याने (MPSC Girl Attacked) हल्ला केला.

या हल्ल्यावेळी त्या मुलीसोबत तिचा आणखी एक मित्र होता. हल्ला झाल्यानंतर ही तरुणी जीव मुठीत धरून धावायला लागली. मात्र तिच्या मागे कोयता घेऊन धावणार्‍या तरूणाला पाहुन कोणीच मदतीला पुढ आलं नाही. जखमी अवस्थेत ती मुलगी धावत होती. एवढ्यात लेशपाल जवळगे (Leshpal Javalge) नावाच्या तरुण त्या मुलीच्या मदतीला धावला. कोयता हातात असलेला तरुण मुलीच्या डोक्यात वार करणार एवढ्यात लेशपाल जवळगेने कोयता पकडला आणि हल्लेखोर तरुणाला रोखले. त्यानंतर इतर लोक पुढे आले आणि हल्लेखोर तरुणाला चोप दिला. त्यानंतर पोलीसांनी हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेतलंय.

कॉलेज तरुणीला वाचवणाऱ्या लेशपाल जवळगेचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान आता लेशपालच्या कामगिरीची अभिनेता किरण माने(Kiran Mane)नेदेखील सोशल मीडियावर प्रशंसा केली आहे. त्यांची ही पोस्ट चर्चेत आली आहे.

किरण माने आजूबाजूला घडणाऱ्या कोणत्याही घटनेवर सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. दरम्यान आता त्यांनी इंस्टाग्रामवर लेशपाल जवळगेचे दोन फोटो शेअर केले आहेत आणि लिहिले की, प्रोटीन पावडरी घेऊन, इंजेक्शनं टोचून जीममध्ये जाऊन दंडाच्या बेंडकुळ्या फुगवणार्‍यांपेक्षा, पुस्तकं वाचून मेंदूत मुरवलेला माणूस जास्त शौर्यवान, धैर्यवान आणि विद्वानही असतो, हे या भावानं दाखवून दिलं !
तुझ्या भावी वाटचालीस शुभेच्छा लेशपाल.

https://www.instagram.com/p/CuCbCnXpJHf/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==