“करण जोहरने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला”, अभिनेत्री अनुष्का शर्माने केलेला खुलासा

अनुष्का शर्मा (Anushka Sharma) तिच्या करिअरच्या सुरुवातीपासूनच तिच्या उत्साहीपणासाठी ओळखली जाते. ती स्पष्टवक्ता आहे आणि कोणत्याही मुद्द्यावर ती ठामपणे भूमिका घेते. पण कधी-कधी तिने गंमतीने अशा गोष्टीही बोलल्या आहेत, ज्याचा तिला नंतर पश्चाताप करावा लागला.

‘कॉफी विथ करण’मध्ये अशीच एक घटना घडली असून अनुष्काने लैंगिक छळाबाबत खळबळजनक विधान केले आणि करण जोहर (Karan Johar) त्याचा बळी ठरला. वास्तविक, अनुष्का म्हणाली होती की तिला करणवर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करायचा आहे. अनुष्का शर्माने करण जोहरच्या ‘ए दिल है मुश्किल’ चित्रपटात काम केले होते आणि यादरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती. त्यानंतर अनुष्का आणि कतरिना कैफ कॉफी विथ करणच्या एका एपिसोडमध्ये पाहुण्या म्हणून दिसल्या. जिथे करणने सांगितले की, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अनुष्कावर त्याचा थोडासा क्रश होता.

यावर उत्तर देताना अनुष्का म्हणाली, “मला खरोखर खूप आनंद होत आहे. कारण मी तुझ्यावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करणार होते.” त्यानंतर अनुष्का कतरिनाकडे वळली आणि म्हणाली की “चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान करण जोहरने मला कधी कधी अयोग्यरित्या स्पर्श केला.” अनुष्काचे हे वक्तव्य ऐकून कतरिनाला आश्चर्याचा धक्का बसला आणि तिने अनुष्काचे म्हणणे थोडे वेगळे ट्विस्ट करण्याचा प्रयत्न सुरू केला.