गरिबी निर्मूलनाच्या आकडेवारीची फेकाफेकी; केंद्रीय मंत्र्यांनी राहुल गांधी यांना झापलं 

नवी दिल्ली-  केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी यूपीए सरकारच्या कार्यकाळातील गरिबी निर्मूलनावर वेगवेगळे आकडे दिल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खरडपट्टी काढली. ते म्हणाले की जेव्हा एखादी व्यक्ती काही महिन्यांतून एकदा भारतात परतते तेव्हा असे होते. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विटरवर एक छोटा व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यूपीएच्या 10 वर्षांच्या राजवटीत गरिबीतून बाहेर काढलेल्या लोकांच्या संख्येवर वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळे आकडे देताना दिसत आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यूपीए सरकारच्या काळात गरिबीतून बाहेर काढलेल्या लोकांची संख्या कधी १४ कोटी, कधी १५ कोटी, कधी २३ कोटी, कधी २७ कोटी असल्याचे सांगितले. किरेन रिजिजू म्हणाले, जेव्हा तुम्ही परदेशातून काही महिन्यांत एकदा भारतात परत येता आणि अर्धवेळ राजकारण करता तेव्हा असे होते.

भीती आणि द्वेषाने भाजप देश कमकुवत करत आहे- राहुल गांधी

राहुल गांधी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर भीती आणि द्वेष पसरवून देश कमकुवत केल्याचा आरोप केला. याचा फायदा भारताच्या शत्रूंना होईल, असे ते म्हणाले. काँग्रेसने दिल्लीत महामोर्चा काढून दरवाढीच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.