होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाची घोडदौड कायम, ऑगस्ट २२ अखेरीस ४६२,५२३ युनिट्सची विक्री

गुरुग्राम  – प्रगतीच्या मार्गावर वेगाने पुढे जात असलेल्या होंडा मोटरसायकलने ऑगस्ट २०२२ महिन्यात झालेल्या विक्रीची आकडेवारी आज जाहीर केली आहे.ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आणि सणासुदीच्या निमित्ताने वितरकांमध्ये असलेल्या उत्साहाच्या जोरावर कंपनीच्या एकूण डिस्पॅचेसमध्ये ऑगस्ट २२ महिन्यात ७ टक्के वाढ होऊन विक्री ४६२,५२३ युनिटवर (४,२३,२१६ देशांतर्गत आणि ३९,३०७ निर्यात) पोहोचली आहे. गेल्या वर्षी म्हणजेच ऑगस्ट २१ मधे ४३१,५९४ युनिट्सची विक्री (४०१,४८० देशांतर्गत आणि ३०,११४ निर्यात) झाली होती. (Honda Motorcycle & Scooter India’s progress continues, sales of 462,523 units as of August 22)

बाजारपेठेत होत असलेल्या प्रगतीविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अत्सुशी ओगाता म्हणाले, ‘गेल्या महिन्याच्या तसेच गेल्या वर्षाच्या तुलनेत बाजारपेठेची कामगिरी सुधारत आहे. विविध प्रकारची उत्पादने लाँच करत आम्ही सणांचे स्वागत करत असून वेगवेगळ्या टचपॉइंट्समध्ये उपलब्ध करण्यात आलेल्या आकर्षक वित्तपुरवठा योजनांमुळे उत्साह द्विगुणित होईल याची आम्हाला खात्री वाटते.’

ऑगस्ट २०२२ ची महत्त्वाची वैशिष्ट्ये

उत्पादन लाँच : नव्या योजनांसह ग्राहकांना आनंद देत एचएमएसआयने बिगविंग आणि रेड विंग विभागांमध्ये चार नवी उत्पादने लाँच केली असून त्यात नवी ताकदवान आणि स्पोर्टी CB300F तसेच अक्टिव्हा प्रीमियम एडिशन, डिओ स्पोर्ट्स आणि शाइन सेलिब्रेशन एडिशन या नव्या एडिशन्सचाही समावेश आहे.

 होंडा बिगविंग नेटवर्क विस्तार – होंडाने मिरा भाईंदर (महाराष्ट्र) आणि आझमगढ (उत्तर प्रदेश) येथे दोन नव्या होंडा बिगविंग आउटलेट्सचे उद्घाटन करत बिगविंग वितरकांचे नेटवर्क विस्तारले आहे.

रस्ते सुरक्षा – एचएमएसायने रायपूर (छत्तीसगढ), अजमेर (राजस्थान), ग्वाल्हेर (मध्य प्रदेश), भवानीपटना (ओडिशा), सिलिगुडी (पश्चिम बंगाल) आणि चंदीगढ येथे जागरूकता शिबिरांचे आयोजन केले होते. कंपनीने रांची (उत्तराखंड) येथील सेफ्टी ड्रायव्हिंग एज्युकेशन सेंटरचा (एसडीईसी) तिसरा वर्धापनदिन साजरा केला.

कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी – समाजाच्या विकासाप्रती असलेली बांधिलकी जपण्यासाठी होंडा इंडिया फाउंडेशनने हरियाणा सरकारच्या मदतीने कर्नाल (हरियाणा) येथे पहिले इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च (आयडीटीआर) सुरू केले आहे. त्याशिवाय कंपनीने सरकारी इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या (आयटीआय) सहकार्याने धरमशाला (हिमाचल प्रदेश) येथे स्किल एनहान्समेंट सेंटरचे उद्घाटन केले.

 मोटरस्पोर्ट्स: होंडा रेसिंग इंडियाचे राजीव सेतु यांनी एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपच्या (एआरआरसी) AP250 क्लासच्या तिसऱ्या फेरीत पाचवे स्थान मिळवत भारतीय रायडरने आतापर्यंत केलेली सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. देशांतर्गत विभागात होंडा SK69 रेसिंग टीमच्या राजीव सेतु यांनी 2022 इंडियन नॅशनल रेसिंग चॅम्पियनशीपच्या तिसऱ्या फेरीत PS165cc विभागातपहिले स्थान मिळवले. कंपनीच्या निष्ठावान चाहत्यांना आनंद देण्यासाठी होंडा रेसिंग कॉर्पोरेशनने २०२२ मोटोजीपी वर्ल्ड चॅम्पिययन जोन मिर यांना मार्क मार्क्वेझ यांच्याबरोबर दोन वर्षांसाठी करारबद्ध केल्याचे जाहीर केले.