घोड्याची मान पकडून बळजबरीनं तोंडात कोंबली सिगरेट, केदारनाथमधील घोडेस्वारावर कारवाई

केदारनाथ यात्रेच्या (Kedarnath Yatra) मार्गावर दोन तरुण एका खेचराला सिगारेट देत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या प्रकरणी खेचराच्या मालकाला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. ही सिगारेट बहुधा गांजाने भरलेली असते ज्याचा धूर मुक्या प्राण्याला पिण्यास भाग पाडले जात आहे. यावर्षी केदारनाथ (Kedarnath Viral Video) यात्रा 25 एप्रिलपासून सुरू झाली असून सुमारे दोन महिन्यांच्या कालावधीत पोलिसांनी घोडे आणि खेचरांवरील अत्याचाराबाबत 14 गुन्हे दाखल केले आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार ही घटना केदारनाथ या ठिकाणची आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, २ तरुण घोड्याला जबरदस्तीनं सिगरेट पाजत आहेत. यापैकी एका तरुणानं घोड्याचं तोंड पकडलंय. व दुसरा त्याच्या तोंडात जळती सिगरेट कोंबतोय. ही सिगरेट टाळण्यासाठी घोडा जीवतोड प्रयत्न करतोय. पण त्या तरुणांनी जबरदस्तीनं त्याला सिगरेट अखेर ओढायला लावलीच. दरम्यान ही अमानुष घटना त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद करून तो व्हिडीओ सोशल मीडियावर देखील शेअर केला. पण हा व्हिडीओ पाहून नेटकरी मात्र प्रचंड भडकले आहेत. या तरुणांवर कठोर कारवाई करा अशी मागणी आता जोर धरू लागली होती.