प्रत्येक गृहिणीला माहित असाव्यात या किचन टिप्स …

होईल इंधन आणि वेळेचीही बचत

१. पावसाळ्यात खोबऱ्याच वाट्या बुरशी आल्या सारख्या होतात तर त्या प्रत्येक वाटीत तुरीची डाळ टाकल्याने बुरशी येत नाही.
२. डाळी उन्हात चांगल्या चार ते पाच दिवस सुकवून भरून ठेवल्या तर टोका, किड पडत नाही .
३. डाळ शिजवण्याच्या आधी भिजायला ठेवली तर डाळ लवकर शिजते गॅस कमी लागतो .
४. तिखट मसाला वर्षासाठी बनवून ठेवायचा असेल तर मसाला भरुन ठेवताना मीठ घालून मसाला बरणीत भरून ठेवल्याने अळी पकडत नाही .
५. हिंगाचे खडे ठेवले तर मसाला चांगला राहतो आणि सुवास ही छान येतो .
६. भाजी जास्त तिखट झाली तर एका टोमॅटोचे दोन उभे तुकडे करून टाकावेत .
७. भाजी खारट झाली तर भाजीत बटाटा कापून किंवा किसून टाकल्याने भाजीतील खारटपणा कमी होतो .
८. भाजी जास्त तिखट झाली तर एका टोमॅटोचे दोन उभे तुकडे करून टाकावेत .
९. भाजी खारट झाली तर भाजीत बटाटा कापून किंवा किसून टाकल्याने भाजीतील खारटपणा कमी होतो.
१०. तिखट, हळद काचेच्या बरणीत भरून ठेवल्याने हळदीचा रंग जसा आहे तसाच राहतो आणि प्लास्टिकच्या बरणीत भरून ठेवल्याने हळदीचातिखटाचा रंग फिका दिसतो त्याने भाजीला रंग येत नाही व भाजी चांगली दिसत नाही .
११. भाजी बनताना भाजीला लाल रंग येण्यासाठी बिटचा एक तुकडा टाकला तर भाजीला रंग छान येतो
१२  . भाजीला चांगला सुवास येण्यासाठी थोडी हिरवी वेलची पूड टाकल्याने चव पण छान येते