राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे वादग्रस्त विधान; म्हणाले, ‘शिवाजी महाराज महाराष्ट्राचे जुने हिरो…’

औरंगाबाद: महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी आज (१९ नोव्हेंबर) पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) हे तर महाराष्ट्राचे जुने आदर्श, असे विधान कोश्यारी यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभात राज्यपाल  कोश्यारी बोलत होते. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला सुरुवात झाली असून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. शिवाजी महाराज यांचे वंशज संभाजीराजे यांनी तर राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर हाकलण्याची मागणी केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी डीलिट पदवी देऊन गौरवण्यात आलं. यावेळी भाषण करताना कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली.

“छत्रपती शिवाजी महाराज हे तर जुने युगाचे आदर्श आहेत. लोकांना आज महाराष्ट्रातच त्यांचे नवे आदर्श सापडतील. ते बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून ते नितीत गडकरी आणि शरद पवार असू शकतात”, असे विधान कोश्यारी यांनी दिले आहे. त्यांच्या या विधानाने नव्या वादाला फोडणी दिली आहे.

शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती संभाजीराजे आणि संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर खरपूस टीका केली आहे.