कृषी सेवा परीक्षेतील उमेदवारांना नियुक्ती, Vijay Wadettiwar यांच्या मागणीला यश

Vijay Wadettiwar: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा मधून उमेदवारांची शिफारस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शासनाकडे केली होती. या उमेदवारांना अनेक दिवसांपासून नियुक्ती न दिल्याने ते आझाद मैदानात बेमुदत आंदोलनाला बसले होते. या उमेदवारांना नियुक्तीचे आदेश तात्काळ द्यावेत, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी विधानसभेत केली केली होती. वडेट्टीवार यांच्या मागणीला यश आले असून निवड झालेल्या उमेदवारांनी वडेट्टीवार यांचे आभार मानले आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

कृषी सेवा परीक्षेतील शिफारस केलेल्या उमेदवारांच्या नियुक्त्या रखडल्याने या उमेदवारांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले होते. वडेट्टीवार यांनी केलेल्या मागणीमुळे नियुक्तीसंदर्भात शासन निर्णय निर्गमित झाला आहे. यामुळे उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. नियुक्त्या रखडल्यामुळे अनेक जिल्ह्यात कृषी अधिकारी पदाच्या जागा रिक्त होत्या. यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत होती. शेतकरी संकटात आहे. या परिस्थितीत नियुक्त्या वेळीच करणे अपेक्षित होते, अशी प्रतिक्रिया देत निवड झालेल्या उमेदवारांचे वडेट्टीवार यांनी अभिनंदन केले आहे.

महत्वाच्या बातम्या : 

विधिमंडळाच्या लॉबीत सत्ताधारी आमदारांची धक्काबुक्की महाराष्ट्राला लाज आणणारी: Nana Patole

Sambhaji Bhide: संभाजी भिडेंच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न, काळे झेंडेही दाखवले

Muralidhar Mohol | मोहोळांनीही उघडले लोकसभेचे पत्ते; म्हणाले, ‘मी लोकसभेची तयारी करतोय, पण…’