केएल राहुलने सांगितले त्याच्या मॅच विनिंग खेळीचे रहस्य, विराटचा ‘तो’ सल्ला आला कामी

KL Rahul: भारतीय संघाने कठीण परिस्थितीवर मात करत चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवरील विश्वचषक 2023 चा पाचवा सामना जिंकला. या सामन्याचे नायक केएल राहुल आणि विराट कोहली (85 धावा) होते. या सामन्यात 97 धावांची नाबाद खेळी करणाऱ्या राहुलला सामनावीराचा पुरस्कार (Man Of The Match Award) देण्यात आला. त्याने षटकार ठोकत भारतीय संघाचा विजय निश्चित केला. केएल राहुलने सांगितले की सुरुवातीच्या विकेट्सच्या सतत पडण्यानंतर, त्याला अंघोळ करण्यासाठी देखील वेळ मिळाला नाही.

भारताने हा सामना सहा गडी राखून जिंकला. सामन्यानंतर अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्सशी बोलताना केएल राहुल म्हणाला, ‘५० षटके यष्टीरक्षण केल्यानंतर मला विश्रांतीची गरज होती. मला वाटले होते की मला विश्रांती करायला मिळेल. पण वेळ न घालवता मला फलंदाजीसाठी विकेटवर यावे लागले. मला ऑस्ट्रेलियाचा डाव संपल्यानंतर आंघोळीला जायचे होते. मला ३० मिनिटांचा ब्रेक मिळेल असे वाटत होते पण मला लगेच तयार होऊन फलंदाजीसाठी उपलब्ध व्हावे लागले.

विराटने केएल राहुलला काय दिला सल्ला?
केएल राहुल पुढे म्हणाला, जेव्हा मी फलंदाजीला आलो तेव्हा विराट कोहलीने (Virat Kohli) मला सांगितले की विकेटमध्ये खूप काही आहे. नवीन चेंडूसह वेगवान गोलंदाज प्रभावी ठरतील. त्यामुळे काही काळ कसोटी सामन्यासारखी फलंदाजी कर. शेवटच्या 15-20 षटकांमध्ये, दवने आपली भूमिका बजावली, त्याने आम्हाला खूप मदत केली. त्यावर खेळणे सोपे नव्हते. ही सपाट विकेट नव्हती. हे क्रिकेटसाठी बरेच चांगले होते, ज्यामध्ये काही फलंदाजासाठी होते तर काही गोलंदाजासाठी.

शतक हुकल्यावर राहुल काय म्हणाला?
केएल राहुलने षटकार खेचून भारताला विजय मिळवून दिला. त्याचे शतक तीन धावांनी हुकले. याविषयी त्याला विचारले असता तो म्हणाला की, मी 100 धावा कशा करता येतील याची गणना केली होती. एकच मार्ग चौकार आणि षटकारांचा होता पण त्याला शतकही गाठता आले नाही याची खंत नव्हती.

महत्वाच्या बातम्या-

IND Vs AUS : कांगारूंची शिकार करत विश्वविजयाची भारताने केली सुरुवात; कोहली-राहुलची अप्रतिम कामगिरी

Ravindra Dhangekar : काँग्रेसच्या महत्वाच्या बैठकीला जाणं रविंद्र धंगेकरांनी टाळलं? समोर आलं मोठं कारण

सिक्कीमच्या ढगफुटीत बीडचा जवान शहीद; उद्या शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार