IND vs AUS : कांगारूंची शिकार करत विश्वविजयाची भारताने केली सुरुवात; कोहली-राहुलची अप्रतिम कामगिरी

IND vs AUS Full Match Highlights: ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी झंझावाती सुरुवात केल्यानंतर, विराट कोहली आणि केएल राहुल (Virat Kohli and KL Rahul) यांनी शानदार खेळी खेळून टीम इंडियाला विश्वचषकातील पहिला सामना जिंकण्यात मदत केली. 200 धावांचा बचाव करताना ऑस्ट्रेलियाने अवघ्या दोन धावांत भारताच्या तीन विकेट गमावल्या होत्या. यानंतर किंग कोहलीने 85 धावांची नाबाद खेळी केली आणि केएल राहुलने टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

जेव्हा भारताने अवघ्या दोन धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर कमी धावसंख्येच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ सामना फिरवेल असे वाटत होते, पण विराट कोहली आणि केएल राहुलने हार मानली नाही आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या धडाकेबाज चेंडूंचा धैर्याने सामना केला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 165 धावांची विक्रमी भागीदारी केली.

ऑस्ट्रेलियाकडून 200 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा, इशान किशन आणि श्रेयस अय्यर खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले. भारताने अवघ्या दोन धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. यानंतर केएल राहुल आणि विराट कोहली यांनी शानदार फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 165 धावांची भागीदारी केली. किंग कोहलीने 116 चेंडूंत सहा चौकारांच्या मदतीने 85 धावांची खेळी केली. तर केएल राहुल 115 चेंडूत 97 धावा काढून नाबाद परतला. राहुलने आपल्या खेळीत 8 चौकार आणि 2 षटकार मारले. अखेरीस, हार्दिक पांड्या आठ चेंडूंत एका षटकारासह 11 धावांवर नाबाद राहिला.

तत्पूर्वी, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि रविचंद्रन अश्विन (Ravindra Jadeja, Kuldeep Yadav and Ravichandran Ashwin) या त्रिकुटाविरुद्ध, ऑस्ट्रेलियन संघ चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर केवळ 199 धावा करू शकला. भारतीय फिरकीपटू कांगारू फलंदाजांसाठी कोडेच ठरले. भारतासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज रवींद्र जडेजा ठरला.सर जडेजाने 10 षटकात 2 मेडन्ससह केवळ 28 धावा दिल्या आणि 3 बळी घेतले. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक ४६ धावा केल्या.

भारताची मारक गोलंदाजी अशी होती की ऑस्ट्रेलियन संघ पूर्ण 50 षटकेही खेळू शकला नाही.नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात चांगली झाली नाही. झंझावाती फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला मिचेल मार्श खातेही न उघडता बाद झाला. जसप्रीत बुमराहने त्याला बाद केले. यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरने दमदार सुरुवात केली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी केली. मात्र, चेंडू जुना झाल्यानंतर दोघांनाही धावा काढणे कठीण झाले.वॉर्नर 52 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 41 धावा करून बाद झाला. तो त्याच्याच चेंडूवर कुलदीप यादवने झेलबाद झाला.

यानंतर मार्नेल लॅबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यात ३६ धावांची भागीदारी झाली, पण स्मिथ बाद होताच ‘तू चल मैं आया’च्या धर्तीवर ऑस्ट्रेलियन फलंदाज बाद झाला. स्मिथने 71 चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने 46 धावा केल्या. लॅबुशेन 41 चेंडूत 27 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर ग्लेन मॅक्सवेल 15, अॅलेक्स कॅरी 00, कॅमरून ग्रीन 08 आणि कर्णधार पॅट कमिन्स केवळ 15 धावा करू शकले.अखेरीस मिचेल स्टार्कने 35 चेंडूत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 28 धावा करत संघाची धावसंख्या 200 च्या जवळ नेली. तर अॅडम झम्पा 06 धावांवर आणि जोश हेझलवूड एका धावेवर नाबाद परतला. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक तीन बळी घेतले. याशिवाय कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर हार्दिक पांड्या, मोहम्मद सिराज आणि रविचंद्रन अश्विन यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

महत्वाच्या बातम्या-

Israel : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री इस्रायलमधल्या युद्धात अडकली; तळघरात लपली आणि संपर्कही तुटला

Israel : पॅलेस्टीनच्या विरोधात इस्रायलने केली युद्धाची घोषणा; स्वोर्ड्स ऑफ आयर्न मोहिमेद्वारे शत्रूला घडवणार अद्दल

विश्रांतवाडी येथील उड्डाणपुलाला एस्टिमेट कमिटीत मान्यता; Jagdish Mulik यांच्या पाठपुराव्याला यश