विश्वचषकातील अनोखा विक्रम कर्णधार रोहितच्या नावावर, धोनी-द्रविड सारख्या दिग्गजांनाही सोडले मागे

ODI World Cup 2023, IND vs AUS: वनडे विश्वचषक 2023 च्या हाय-व्होल्टेज सामन्यात यजमान भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी झाला. या सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा (Rohit Sharma) याने केले. रोहितचा कर्णधार म्हणून विश्वचषकातील हा पहिलाच सामना आहे. या सामन्यात नाणेफेकसाठी बाहेर पडताच रोहितने एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केला आहे.

रोहितने अनोखा विक्रम केला
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदभार स्वीकारताच रोहित शर्मा विश्वचषक इतिहासातील सर्वात वयस्कर कर्णधार बनला (Oldest Captain In World Cup) आहे. रोहितचे वय सध्या 36 वर्षे 161 दिवस आहे. त्याने या विक्रमात माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनला मागे टाकले आहे. 1999 च्या विश्वचषकात टीम इंडियाचे कर्णधार असलेल्या अझरुद्दीनचे वय 36 वर्षे 124 दिवस होते.

विश्वचषक सामन्यातील भारतासाठी सर्वात वयस्कर कर्णधार:
36 वर्षे 161 दिवस- रोहित शर्मा (2023)
36 वर्षे 124 दिवस- मोहम्मद अझरुद्दीन (1999)
34 वर्षे 71 दिवस – राहुल द्रविड (2007)
34 वर्षे 56 दिवस- एस वेंकटराघवन (1979)
33 वर्षे 262  दिवस- एमएस धोनी (2015)

खेळाडू म्हणून दोन विश्वचषक खेळले
रोहित शर्माने यापूर्वी टीम इंडियासाठी खेळाडू म्हणून दोन विश्वचषक खेळले आहेत. 2011 च्या विश्वचषकात रोहितला संघात स्थान मिळू शकले नाही. पण यानंतर हा खेळाडू 2015 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली आणि त्यानंतर 2019 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळला. दोन्ही वेळा टीम इंडिया उपांत्य फेरीत पराभूत होऊन बाहेर पडली. विश्वचषक 2019 मध्ये सर्वाधिक धावा (648) करणारा फलंदाज रोहित होता.

महत्वाच्या बातम्या-

IND Vs AUS : कांगारूंची शिकार करत विश्वविजयाची भारताने केली सुरुवात; कोहली-राहुलची अप्रतिम कामगिरी

Ravindra Dhangekar : काँग्रेसच्या महत्वाच्या बैठकीला जाणं रविंद्र धंगेकरांनी टाळलं? समोर आलं मोठं कारण

सिक्कीमच्या ढगफुटीत बीडचा जवान शहीद; उद्या शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार