टीम इंडियाने विश्वचषकासाठी शोधले मोठे शस्त्र, जाणून घ्या विरोधी संघांसाठी ते कसे घातक ठरेल

Kuldeep yadav : भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. यामध्ये टीम इंडियाने 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. भारताकडून दुसऱ्या सामन्यात कुलदीप यादवने शानदार गोलंदाजी केली. कुलदीपने ३ बळी घेतले. चायनामन गोलंदाज कुलदीपने यापूर्वी अनेक वेळा भारतासाठी चांगली गोलंदाजी केली आहे. 2023 च्या विश्वचषकात (ODI World Cup 2023) तो भारतासाठी सर्वात मोठे शस्त्र ठरू  शकतो.

यावेळी विश्वचषक स्पर्धा भारतात होणार आहे. येथील खेळपट्ट्यांवर फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले आहे. त्यामुळे यावेळी प्रत्येक संघासाठी फिरकी गोलंदाज महत्त्वाचे ठरणार आहेत. अशा परिस्थितीत कुलदीप यादव टीम इंडियासाठी घातक शस्त्र ठरू शकतो. कुलदीपने आतापर्यंत 74 वनडेत 122 विकेट घेतल्या आहेत. भारताच्या विजयात त्याने अनेकदा महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

कुलदीपची श्रीलंकेविरुद्धची कामगिरी पाहिली तर तो खूप प्रभावी ठरला आहे. तो आक्रमक गोलंदाजी करताना दिसला आहे. दुसऱ्या सामन्यात त्याने प्रथम कुसल मेंडिसला बळी बनवले आणि त्यानंतर श्रीलंकेचा संघ पत्त्यासारखा विखुरला. कुलदीपने एकूण 3 विकेट्स आपल्या नावावर केल्या. मधल्या षटकांमध्ये तो अतिशय प्रभावी गोलंदाजी करतो. विश्वचषकात भारत कुलदीपचा चांगला वापर करू शकतो.

विशेष म्हणजे, कुलदीप यादवने टीम इंडियासाठी आतापर्यंत 74 एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि या काळात त्याने 122 विकेट घेतल्या आहेत. 25 धावांत 6 विकेट घेणे ही त्याची वनडेतील सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने 24 टी-20 डावात 44 विकेट घेतल्या आहेत. कुलदीपने 8 कसोटी सामन्यात 34 बळी घेतले आहेत. यासोबतच त्याने देशांतर्गत सामने आणि इंडियन प्रीमियर लीगमध्येही चांगली कामगिरी केली आहे  .